आमचा विदर्भ - अनंता गोखरे
राजुरा (दि. ३१ ऑक्टोबर २०२५) –
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतून कार्यरत असलेले राजुरा शहरातील अनेक तरुणांनी मनसेचा राजीनामा देत जय भवानी कामगार संघटनेत प्रवेश केला आहे. या तरुणांनी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष सुरज ठाकरे यांच्या नेतृत्व व जनसेवेतील लढवय्या भूमिकेने प्रेरित होऊन हा निर्णय घेतल्याची माहिती मिळाली आहे. दिनांक २३ ऑगस्ट २०२४ रोजी राजुरा येथील आदित्य भाके यांची मनसे तालुका अध्यक्ष, रोहीत बत्ताशंकर यांची तालुका उपाध्यक्ष आणि साहिल चौधरी यांची शहर उपाध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. पक्षप्रवेशानंतर रोहीत बत्ताशंकर यांनी जनतेच्या प्रश्नांसाठी सातत्याने लढा दिला. नागरिकांच्या तक्रारींचे निवारण करण्याकरिता त्यांनी संबंधित विभाग आणि रुग्णालयात तत्परता दाखवली. मात्र, प्रशासनाच्या निष्क्रियतेमुळे त्यांच्यात शाब्दिक बाचाबाची झाली आणि जनतेच्या न्यायासाठी प्रयत्न करताना त्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल झाला. या काळात त्यांना चंद्रपूर जिल्ह्यातील मनसेच्या वरिष्ठ नेत्यांकडून कोणतीही मदत मिळाली नाही.
या संकटाच्या काळात जय भवानी कामगार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष सुरज ठाकरे यांनी मदतीचा हात पुढे केला. ही पहिलीच वेळ नव्हती, यापूर्वीही त्यांनी सामाजिक व न्यायिक पातळीवर अनेकांना साथ दिली आहे. जनतेच्या न्यायासाठी सातत्याने लढणाऱ्या सुरज ठाकरे यांच्या या भूमिकेने प्रेरित होऊन ३० ऑक्टोबर २०२५ रोजी राजुरा शहरातील तरुणांनी मनसे पक्षाचा राजीनामा देत जय भवानी कामगार संघटनेत प्रवेश केला.
राजुरा येथील संघटनेच्या जनसंपर्क कार्यालयात झालेल्या या कार्यक्रमात सुरज ठाकरे यांच्या हस्ते नव्या सदस्यांचा पक्षप्रवेश करण्यात आला. यावेळी रोहीत बत्ताशंकर यांची जय भवानी कामगार संघटनेच्या युवा शहराध्यक्ष राजुरा म्हणून नियुक्ती करण्यात आली. त्यांच्या पुढील वाटचालीसाठी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी शुभेच्छा दिल्या. संघटनेत प्रवेश करणाऱ्यांमध्ये रोहीत बत्ताशंकर, राज लड्डा, साहिल चौधरी, बालाजी चौधरी, यश डोंगरे, गणेश लांडे, विजय तलांडे, सागर मिसलवार, चेतन मेश्राम, आशिष वडसकर, साहिल कायडिंगे आदी तरुणांचा समावेश आहे.
#JaiBhawaniWorkersUnion #RajuraYouthPower #SurajThakare #LeadershipForJustice #YouthForChange #RajuraPolitics #VoiceOfPeople #jaibhavanikamgarsanghtna #rohitbattashankar #chandrapurnews #chandrapurcity #chandrapur #aamchavidarbha #vidarbha

टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.