आमचा विदर्भ - दीपक शर्मा
चंद्रपूर (दि. २९ ऑक्टोबर २०२५) -
जिल्ह्यात वाढत्या अंमली पदार्थ विक्रीवर आळा घालण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेने मोठी कारवाई केली असून, फॉरेस्ट अकादमी, मूल रोड परिसरात नाकाबंदी दरम्यान दोन तरुणांना पकडण्यात पोलिसांना यश आले आहे. त्यांच्या ताब्यातून तब्बल 160 ग्रॅम एमडी (मेफोड्रॉन) ड्रग पावडर आणि एकूण 16 लाख 12 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. गुप्त माहितीच्या आधारे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ही कारवाई केली. पथकाला कळले होते की, दीपक कृष्णा वर्मा वय 28, रा. संजयनगर, चंद्रपूर आणि आशिष प्रकाश वाळके वय 30, रा. मित्रनगर, चंद्रपूर हे पांढऱ्या रंगाच्या डिजायर कार क्रमांक MH-49 AS-2704 मधून अंमली पदार्थ घेऊन शहरात येत आहेत. त्यानुसार, फॉरेस्ट अकादमी समोर पोलिसांनी नाकाबंदी केली. थोड्याच वेळात संशयितांची कार आल्यानंतर पोलिसांनी वाहन थांबवून तपासणी केली असता, वाहनातून 160 ग्रॅम एमडी ड्रग पावडर आढळली. तत्काळ दोघांनाही ताब्यात घेऊन रामनगर पोलीस ठाण्यात एनडीपीएस कायद्यानुसार गुन्हा नोंदवण्यात आला.
ही कारवाई पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांच्या आदेशाने आणि अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अमोल काचोरे यांच्या नेतृत्वात ही यशस्वी कारवाई पार पडली. या पथकात सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक कांक्रेडवार, पोलीस उपनिरीक्षक सर्वेश बेलसरे, पोलीस उपनिरीक्षक सुनिल गौरकार, पोलीस हवालदार सुभाष गोहोकार, सतिश अवथरे, रजनिकांत पुठ्ठावार, दीपक डोंगरे, इम्रान खान, किशोर वाकाटे, शशांक बदामवार, हिरालाल गुप्ता आणि अजित शेंडे यांचा समावेश होता. या कारवाईमुळे चंद्रपूर पोलिसांनी पुन्हा एकदा अंमली पदार्थ विक्रेत्यांच्या मुसक्या आवळत शहरातील युवकांना व्यसनाधीनतेपासून वाचवण्याचा प्रयत्न केला आहे.
#ChandrapurPolice #DrugBust #AntiNarcoticsAction #MDDrugsSeized #CrimeBranchSuccess #SayNoToDrugs #ChandrapurNews #LawAndOrder #PoliceAction #SafeChandrapur #chandrapurnews #chandrapurcity #chandrapur #aamchavidarbha #vidarbha

टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.