आमचा विदर्भ - दीपक शर्मा
चंद्रपूर (दि. 28 ऑक्टोबर 2025) -
भारतीय संस्कृतीतील श्रद्धा, संयम आणि निसर्गपूजेचे प्रतीक असलेला पारंपरिक छठ पूजा उत्सव चंद्रपूर शहरातील रामाळा तलावाच्या किनारी अत्यंत भक्तिभावाने आणि उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. शहरातील विविध भागांतून मोठ्या संख्येने श्रद्धाळू महिला-पुरुष या धार्मिक विधीमध्ये सहभागी झाले. या धार्मिक सोहळ्याला मार्गदर्शक म्हणून महाराष्ट्र राज्याचे माजी कॅबिनेट मंत्री तसेच जिल्ह्याचे माजी पालकमंत्री आणि आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी दृकश्राव्य माध्यमातून उपस्थित राहून सर्व श्रद्धाळूंना छठ पूजेच्या शुभेच्छा दिल्या. त्यांनी या सणाद्वारे निसर्ग, स्वच्छता आणि कौटुंबिक ऐक्याचा संदेश दिला.
कार्यक्रमाच्या प्रसंगी स्वामीनारायण मंदिर, चंद्रपूरचे मनीष महाराज, भारतीय जनता पार्टी जिल्हा चंद्रपूरचे महामंत्री डॉ. मंगेश गुलवाडे, प्रकाश धारणे, आणि सुरज पेदुलवार यांची प्रमुख उपस्थिती लाभली. या संपूर्ण धार्मिक कार्यक्रमाचे नियोजन छठ सेवा समितीचे अध्यक्ष रुद्र नारायण तिवारी आणि त्यांच्या कार्यकर्त्यांच्या चमूने अत्यंत सुव्यवस्थितरीत्या केले. सकाळपासूनच रामाळा तलाव परिसरात स्वच्छता, सजावट आणि पूजेच्या तयारीचा माहोल पाहायला मिळाला. श्रद्धाळूंनी उपवास, स्नान आणि सूर्यदेवाला अर्घ्य अर्पण करत आपल्या कुटुंबाच्या आरोग्य, आनंद आणि समृद्धीची प्रार्थना केली. महिलांनी पारंपरिक वेशभूषेत छठ मइयाची पूजा करत भक्तीभावाने सूर्यदेवाला अर्घ्य दिले. छठ पूजेच्या माध्यमातून स्वच्छता, निसर्गाचा सन्मान आणि समाजातील एकतेचा संदेश चंद्रपूरकरांपर्यंत पोहोचविण्यात आला.
या धार्मिक कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी महेश झिटे, रवी लोणकर, प्रवीण गुरमवार, सोहम बुटले, हर्षल जीवने, पिंटू यादव, राजेश यादव, बंटी गुप्ता, रवी गुज्जा, सुनील परसराम, सुनील यादव, प्रेम बवारिया, मनभरन यादव, अमित निरंजने, उमेश आष्टणकर, आशिष गिरडकर यांनी विशेष परिश्रम घेतले.
#ChhathPuja #RamalaTalao #Chandrapur #ChandrapurNews #ChandrapurCity #AamchaVidarbha #Vidarbha #ChhathFestival #DevotionAndFaith #SunWorship #IndianCulture #CommunitySpirit #chandrapurnews #chandrapurcity #chandrapur #aamchavidarbha #vidarbha

टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.