Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author
Title: पद नसतानाही निमकर देतात प्रेरणा - हंसराज अहिर
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
शिक्षक, उद्योजक, सरपंचांचा सत्कार - राजुरात मान्यवरांची मोठी उपस्थिती आमचा विदर्भ - अनंता गोखरे  राजुरा (दि. ०६ सप्टेंबर २०२५) -         माज...
शिक्षक, उद्योजक, सरपंचांचा सत्कार - राजुरात मान्यवरांची मोठी उपस्थिती
आमचा विदर्भ - अनंता गोखरे 
राजुरा (दि. ०६ सप्टेंबर २०२५) -
        माजी आमदार सुदर्शन निमकर यांच्या वाढदिवसानिमित्त स्थानिक जीम्नेशियम सभागृहात आयोजित सत्कार सोहळ्यात विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांचा गौरव करण्यात आला. सामाजिक बांधिलकी जोपासत इतरांना प्रेरणा देणारे निमकर यांचे कार्य प्रशंसनीय असल्याचे मत राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष तथा माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर यांनी व्यक्त केले.

        या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान हंसराज अहिर यांनी भूषविले. प्रमुख पाहुणे म्हणून माजी आमदार अँड. संजय धोटे, चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष रविंद्र शिंदे, माजी आमदार तथा जिल्हा सहकारी बँक संचालक सुदर्शन निमकर, संचालक विजय बावणे, विमाशीचे माजी अध्यक्ष केशवराव ठाकरे, ज्येष्ठ नेते सुरेश केंद्रे, शिवाजी शेलोकर, अरुण मस्की, माजी जि. प. सदस्य अविनाश जाधव, जिल्हा सरपंच संघटनेचे अध्यक्ष व ग्रा. पं. कळमना सरपंच नंदकिशोर वाढई, कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती संजय पावडे, उद्योजक निलेश ताजणे, चुनाळाचे सरपंच बाळनाथ वडस्कर, प्रा. संभाजी वारकड आदी मान्यवर उपस्थित होते. नियोजित प्रमुख अतिथी शिक्षक आमदार तथा वि.मा.शि. सरकार्यवाह सुधाकर अडबाले यांनी शिक्षक दिनाच्या कार्यक्रमात व्यस्त असूनही उपस्थित राहून शुभेच्छा दिल्या.


        याप्रसंगी जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त शिक्षक, मुख्यमंत्री माजी शाळा सुंदर शाळा स्पर्धेत पारितोषिक विजेत्या शाळांचे मुख्याध्यापक व शिक्षक, आर. आर. (आबा) पाटील सुंदर गाव योजनेत निवड झालेल्या ग्रामपंचायतींचे सरपंच व सदस्यांचा सत्कार झाला. तसेच कुपोषण मुक्त चळवळीत योगदान दिल्याबद्दल अमित महाजनवार, लोकमत महाराष्ट्र रत्न पुरस्कार विजेते दुग्ध व्यवसाय उद्योजक निलेश ताजणे व संतोष मोतेवाड, राज्यस्तरीय आदर्श शिक्षक सुधाकर चंदनखेडे, अंधश्रद्धा निर्मूलन व जनजागृती उपक्रमांतर्गत कार्य करणारे संतोष कुंदोजवार, योग क्षेत्रात योगदान देणारे प्रा. दत्तात्रय मोरे व प्रा. सुनिता अरुण जमदाडे यांचाही सत्कार करण्यात आला.


        माजी आमदार सुदर्शन निमकर हे आपला वाढदिवस साजरा करण्याऐवजी सामाजिक कार्याच्या माध्यमातून नवे उपक्रम राबविण्यास प्राधान्य देतात. मागील अनेक वर्षांपासून शेतकरी, महिला, शिक्षक व सामाजिक बांधिलकी जपणाऱ्यांचा गौरव करून ते प्रेरणादायी कार्य करत आहेत. याआधी सकाळी चुनाळा येथे श्री तिरुपती बालाजी मंदिरात निमकर यांच्या दीर्घायुष्यासाठी महाआरती, वृक्षारोपण आणि राजुरा उपजिल्हा रुग्णालयातील रूग्णांना फळ वाटपाचा कार्यक्रम झाला. या सोहळ्याला नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती लाभली.

#SocialCommitment #RajuraEvent #Leadership #Inspiration #CommunityService #HonourCeremony #PositivePolitics #chandrapurnews #chandrapurcity #chandrapur #aamchavidarbha #vidarbha

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top