Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: ईद ए मिलादुन्नबी उत्सवाने कोरपन्यात धार्मिक सौहार्दाचे उदाहरण
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
आमचा विदर्भ - दीपक शर्मा  कोरपना (दि. ०६ सप्टेंबर २०२५) -         कोरपना नगरीत प्रेषित हजरत मोहम्मद पैगंबर यांच्या जन्मदिनानिमित्त ईद ए मिला...
आमचा विदर्भ - दीपक शर्मा 
कोरपना (दि. ०६ सप्टेंबर २०२५) -
        कोरपना नगरीत प्रेषित हजरत मोहम्मद पैगंबर यांच्या जन्मदिनानिमित्त ईद ए मिलादुन्नबीचा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. पैगंबरांच्या जीवनचरित्रातून दिलेल्या शिकवणीप्रमाणे अहिंसा, शांती, सद्भावना आणि बंधुत्वाचा संदेश देत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. गावातील मुख्य मार्गाने पैगंबरांच्या संदेशांची घोषणाबाजी करीत भव्य मिरवणूक काढण्यात आली. मिरवणुकीदरम्यान ठिकठिकाणी शरबत, मिठाई, फळे आणि नाश्त्याची व्यवस्था करण्यात आली. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक विजय बावणे व युवा प्रतिष्ठान मंडळाने नगर पंचायत परिसरात मुस्लिम बांधवांना शुभेच्छा दिल्या.

        आमदार देवराव भोंगडे हे जुलूसमध्ये सहभागी जाले. समाजबांधवांनी मौलाना शेरखान, मौलाना रशीद, नुरानी मस्जिद कमेटीचे अध्यक्ष असरार अली यांचा सत्कार करून सर्वांना शुभेच्छा दिल्या. रजा ॲक्शन कमेटी, वार्ड क्र.१६ ऑटो चालक वाहक संघटना, युवा खिदमत कमेटी यांनी बिरसामुंडा चौक येथे नाश्ता, पाणी, मिठाई व फळांचे वाटप केले. या कार्यक्रमात समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.


        या जुलूसात आबिद अली, हाजी रफीक, हाजी सत्तार, सुहेल अली, मोहब्बत खान, इस्माईल शेख, शहेबाज अली, नदीम अली, अबरार अली, निसार शेख, मोहम्मद फैजान पारेख, अब्दुल वहाब, दाऊदभाई, इमरान अली, नादीर कादरी, मजीद शेख, शौकत अली, नवाज शेख तसेच संजय मुसळे, किशोर बावने, मनोहर चन्ने, विशाल गज्जलवार, अमोल आसेकर, अरुण मडावी, सुनिल देरकर आदींनी सहभाग नोंदवून शुभेच्छा दिल्या. मदरसा पंटागण येथे फातिहाखानी व सामूहिक भोजनाने या सोहळ्याचा समारोप झाला. पोलीस सहाय्यक निरीक्षक केकन राठोड यांच्या नेतृत्वाखाली पोलीस कर्मचाऱ्यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.

#EidEMiladUnNabi #KorapnaCelebration #PeaceAndUnity #ProphetTeachings #Brotherhood #Harmony #CommunitySpirit #chandrapurnews #chandrapurcity #chandrapur #aamchavidarbha #vidarbha

About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top