आमचा विदर्भ - दीपक शर्मा
राजुरा (दि. ०८ सप्टेंबर २२५) -
माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री व मागासवर्गीय आयोगाचे राष्ट्रीय अध्यक्ष हंसराज अहिर हे दरवर्षी गणेशोत्सवाच्या काळात राजुरा शहरातील गणेश मंडळांना प्रत्यक्ष भेट देऊन देणगी व भेटवस्तू सुपूर्द करतात. परंतु यावर्षी काही अपरिहार्य कारणास्तव त्यांना राजुराला येणे शक्य झाले नाही. तरीदेखील त्यांनी परंपरा कायम ठेवत त्यांच्या वतीने भाजप पदाधिकाऱ्यांना गणेश मंडळांना भेट देऊन देणगी सुपूर्द करण्याची विनंती केली. त्यांच्या सूचनेनुसार भाजप पदाधिकारी अरुण मस्की व सतीश धोटे यांच्या नेतृत्वात राजुरा शहरातील सर्व प्रमुख गणेश मंडळांना भेट देण्यात आली. यावेळी हंसराज अहिर यांच्या वतीने पाठवण्यात आलेल्या भेटवस्तू व वर्गणी मंडळ पदाधिकाऱ्यांच्या सुपूर्द करण्यात आली.
या उपक्रमात भाजप चे जिल्हा उपाध्यक्ष अरुण मस्की, भाजप पदाधिकारी सतीश धोटे, माजी नगरसेवक राजू डोहे, जनार्दन निकोडे, महादेव तपासे, सचिन शेंडे, संदीप पारखी, दिलीप वांढरे, संजय जयपूरकर, राजू गौरशेट्टीवार, पूनम शर्मा, शुभम मस्की, प्रवीण भसाखत्री, सुरेश कल्पल्लीवार आदींसह शहरातील गणेश मंडळाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी पदाधिकाऱ्यांनी हंसराज अहिर उपस्थित राहू न शकल्याबद्दल खेद व्यक्त करत गणेश मंडळांना गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या. या उपक्रमामुळे गणेश मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनीही समाधान व्यक्त केले.
#GaneshFestival2025 #HansrajAhir #RajuraNews #BJPActivities #GaneshMandals #FestivalTradition #ChandrapurUpdates #chandrapurnews #chandrapurcity #chandrapur #aamchavidarbha #vidarbha #satishdhote #arunmaski #rajudohe #mahadeotapase
टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.