Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: मा. आमदार सुदर्शन निमकर यांच्या वाढदिवसानिमित्त सामाजिक कार्यकर्त्यांचा गौरव
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
हंसराज अहिर यांच्या हस्ते सामाजिक कार्यकर्त्यांचा सत्कार आमचा विदर्भ - अनंता गोखरे  राजुरा (दि. ०५ सप्टेंबर २०२५) -       माजी आमदार तथा जिल...
हंसराज अहिर यांच्या हस्ते सामाजिक कार्यकर्त्यांचा सत्कार
आमचा विदर्भ - अनंता गोखरे 
राजुरा (दि. ०५ सप्टेंबर २०२५) -
      माजी आमदार तथा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक सुदर्शन निमकर यांच्या वाढदिवसानिमित्त एका विशेष समारंभाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री तथा राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहिर यांच्या हस्ते सामाजिक कार्यकर्ते संतोष कुंदोजवार यांचा अंधश्रद्धा निर्मूलन आणि व्यसनमुक्ती प्रबोधन कार्याबद्दल स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. समाजात वैज्ञानिक दृष्टिकोन रुजवण्यासाठी आणि तरुण पिढीला व्यसनाच्या विळख्यातून मुक्त करण्यासाठी केलेल्या कार्याची दखल घेऊन हा सन्मान प्रदान करण्यात आला. या वेळी उपस्थित मान्यवरांनी त्यांच्या कार्यामुळे समाजात सकारात्मक बदल घडत असल्याचे प्रतिपादन केले.

        सुदर्शन निमकर यांनी आपल्या वाढदिवसाच्या कार्यक्रमात सामाजिक कार्यकर्त्यांच्या कार्याचे कौतुक करताना, "अंधश्रद्धा निर्मूलन आणि व्यसनमुक्तीच्या क्षेत्रात केलेले प्रयत्न समाजाला प्रेरणा देणारे आहेत," असे मत व्यक्त केले. तर हंसराज अहिर यांनीही हे कार्य सामाजिक सुधारणेचा आधारस्तंभ असल्याचे नमूद केले. या समारंभाला माजी आमदार अँड. संजय धोटे, माध्यमिक शिक्षक संघाचे केशवराव ठाकरे, निलेश ताजने यांसह अनेक मान्यवर, सामाजिक कार्यकर्ते आणि नागरिक उपस्थित होते. यानिमित्त काही शिक्षक, मुख्याध्यापक, सरपंच व समाजसेवकांचा या कार्यक्रमात सन्मान करण्यात आला.

#SudharshanNimkar #HansrajAhir #advsanjaydhote #keshavraothakare #nileshtajane #SocialChange #AntiSuperstition #DeAddiction #Jivati #CommunityService #Inspiration #chandrapurnews #chandrapurcity #chandrapur #aamchavidarbha #vidarbha

About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top