आमचा विदर्भ - अनंता गोखरे
राजुरा (दि. ०५ सप्टेंबर २०२५) -
शहरातील ॲड. यादवराव धोटे महाविद्यालयात श्रीगुरुदेव सेवाश्रमच्या वतीने राष्ट्रसंत तुकडोजी महाराज निबंधस्पर्धेचे आयोजन करण्यात आले. ही निबंधस्पर्धा राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या साहित्य व तत्त्वज्ञानावर आधारित होती. विद्यार्थ्यांना *राष्ट्रसंतांचा वैज्ञानिक दृष्टिकोन*, सणोत्सव आणि ग्रामनाथ या तिन्ही विषयांपैकी एक विषय निवडून निबंध लेखन करणे बंधनकारक होते. या स्पर्धेत एकूण ४० विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला.
स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांना गौरविण्यात येणार असून सर्व सहभागींना सन्मानपत्र प्रदान करण्यात येईल. या कार्यक्रमाचे आयोजन संस्थेचे सचिव ॲड. अर्पीत धोटे यांच्या सहकार्याने करण्यात आले. प्राचार्या वर्षा पोडे यांच्या मार्गदर्शनाखाली प्राध्यापक डि.पी. डवरे, प्राध्यापिका आर.जे. देशकर आणि प्राध्यापक जि.एम. झाडे यांनी महत्त्वपूर्ण सहकार्य केले.
निबंधस्पर्धेच्या आयोजनाबद्दल ॲड. राजेंद्र जेनेकर, लटारु मत्ते, बळीराम बोबडे, मनोहर बोबडे, सुभाष पावडे, गजानन बोबडे, विनायक सोयाम (प्रचारक), पांडुरंग शेंडे (प्रचारक), बाबुराव पहानपटे, शामसुंदर कारेकर, राजेश वाटेकर, भाऊराव बोबडे, सुरेश बोंडे, बंडू झोडे, सचिन वाटेकर, वामनराव देवतळे, संतोष खाडे, छत्रपती गेडाम, रविंद्र वांढरे, मोहन वडस्कर, मनोहर पासपुते, मारोती लोहे, रमेश धानोरकर, पुंडलिक काकडे, किशोर झाडे, रत्नाकर नक्कावार आदींनी शिक्षकवृंद व आयोजकांचे मनःपूर्वक आभार मानले. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या विचारांचा प्रचार-प्रसार होऊन वैज्ञानिक दृष्टिकोन वाढीस लागण्यास मदत होणार असल्याचे उपस्थितांनी नमूद केले.
#Rajura #TukdojiMaharaj #EssayCompetition #StudentTalent #ScientificOutlook #CulturalHeritage #EducationForChange #YouthInspiration #chandrapurnews #chandrapurcity #chandrapur #aamchavidarbha #vidarbha
टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.