कत्तलीसाठी नेत असलेली जनावरे वाचविली!
स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई
गोपनीय माहितीवरून छापा!
आमचा विदर्भ - दीपक शर्मा
चंद्रपूर (दि. 16 एप्रिल 2025) -
चंद्रपूर जिल्ह्यात पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन व अप्पर पोलीस अधीक्षक रीना जनबंधू यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु असलेल्या अवैध धंद्यांविरोधातील धडक मोहिमेमध्ये स्थानिक गुन्हे शाखेने मोठी कारवाई केली आहे. कत्तलीसाठी अवैधरित्या जनावरे वाहून नेणाऱ्या दोन मालवाहक ट्रकला थांबवत एकूण 70 गोवंश (गाय व बैल) जप्त करण्यात आले असून, या मालवाहनांसह जप्तीचा एकूण अंदाजे बाजारमूल्य 54 लाख रुपये एवढा आहे.
गोपनीय माहितीवरून सापळा रचून कारवाई
दिनांक 16 एप्रिल 2025 रोजी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला गोपनीय माहिती मिळाली होती की, गडचिरोली जिल्ह्यातील चामोर्शी येथून मूल–चंद्रपूर मार्गे तेलंगणा राज्यात मोठ्या प्रमाणात जनावरे कत्तलीसाठी अवैधरित्या वाहून नेली जाणार आहेत. मिळालेल्या माहितीच्या आधारे त्वरित नाकाबंदी करत चामोर्शी मार्गावर दोन संशयित ट्रकना थांबवण्यात आले.
हि सुद्धा बातमी वाचा -
हि सुद्धा बातमी वाचा -
क्रूरतेचा कळस — दोरांनी बांधलेले गोवंश
पोलीसांनी दोन्ही ट्रकमधील झाकणं काढून पाहणी केली असता, 35+35 अशा एकूण 70 गोवंश जनावरांना कोणतीही चारापाणी व्यवस्था न करता दोरांनी पाय बांधून निर्दयपणे आडवे पाडून वाहतूक करण्यात येत होती. ही वाहतूक कत्तलीसाठी असल्याचा प्राथमिक संशय पोलीसांनी नोंदवला आहे.
या घटनेत एका ट्रकचा चालक राजीक जब्बार खान वय 50, रा. गडचांदूर याला अटक करण्यात आली असून अन्य आरोपींमध्ये शाहरुख खान रा. नागपूर, करीम खान रा. नागपूर, राजू कुरेशी कामठी-नागपूर, इरफान शेख रा. गडचांदूर, प्रशांतजुमनाके रा. गडचांदूर यांचा समावेश आहे. काही आरोपी घटनास्थळावरून पळून जाण्यात यशस्वी ठरले असून त्यांच्या अटकेसाठी शोध मोहीम सुरू आहे.
गोवंश सुपूर्त — गुन्हा दाखल
जप्त करण्यात आलेल्या सर्व गोवंश जनावरांना ‘प्यार फाउंडेशन गौरक्षण संस्था, पडोली’ येथे सुरक्षितपणे सुपूर्त करण्यात आले आहे. आरोपींविरोधात पोलीस स्टेशन मुल येथे विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपासासाठी आरोपीस पोलीस कोठडीत देण्यात आले आहे.
कोणत्या पथकाने केली ही कामगिरी?
ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अमोल काचोरे यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक विनोद भुरले, मधुकर सामलवार, सुनील गौरकार, सुभाष गोहकार, रजनीकांत पुठ्ठावार, सतीश अवथरे, दीपक डोंगरे, सुरेंद्र महंतो, चेतन गज्जलवार, कार्तिक खनके, प्रशांत नागोसे, किशोर वकाटे, गणेश भोयर, शशांक बदामवार, दिनेश आराडे व मिलिंद टेकाम स्थानिक गुन्हे शाखा चंद्रपूर तसेच तसेच पोलीस स्टेशन तळोधी येथील सपोनि संगीता हेलोंडे, रत्नाकर देहारे, अक्षय हटवार, सुरेश आत्राम यांनी केली. या कारवाईनंतर चंद्रपूर पोलिसांनी स्पष्ट इशारा दिला आहे की, गोरक्षक कायद्याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल, व कोणत्याही प्रकारच्या अवैध कृत्यांना जिल्ह्यात थारा दिला जाणार नाही.
टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.