Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author
Title: आयपीएल सामन्यावर ऑनलाईन सट्टेबाजी
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
आयपीएल सामन्यावर ऑनलाईन सट्टेबाजी राजुरा पोलिसांची कारवाई, 1.85 लाखांचा मुद्देमाल जप्त आमचा विदर्भ - दीपक शर्मा राजुरा (दि. 16 एप्रिल 2025) ...
आयपीएल सामन्यावर ऑनलाईन सट्टेबाजी
राजुरा पोलिसांची कारवाई, 1.85 लाखांचा मुद्देमाल जप्त
आमचा विदर्भ - दीपक शर्मा
राजुरा (दि. 16 एप्रिल 2025) -
        चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध लखनऊ यांच्यातील आयपीएल 2025 सामन्यात ऑनलाईन सट्टेबाजी करणाऱ्या आरोपींवर राजुरा पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. दिनांक 14 एप्रिल 2025 रोजी गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी नाका क्रमांक 3, स्टार बारसमोर सुझुकी स्कूटरवर बसून मोबाईलद्वारे ऑनलाईन सट्टा घेत असलेल्या इसमावर छापा टाकला. या कारवाईत एक आरोपी ऋग्देव निनाद येरने (वय 22 वर्षे), रा. आंबेडकर चौक, पेटवार्ड, राजुरा याला अटक करण्यात आली आहे. तर दुसरा आरोपी आशिष भैया याचा ठावठिकाणा अजून मिळालेला नाही व तो सध्या फरार आहे. 

पोलिसांनी जप्त केलेला मुद्देमाल :
  • सुझुकी अ‍ॅक्सेस दुचाकी (क्र. MH34 CC 7682) - किंमत 60,000/-
  • iPhone 13 Pro Max मोबाईल - किंमत 60,000/-
  • रोख रक्कम - 65,000/-
  • एकूण जप्त मुद्देमाल - 1,85,000/-
        वरील आरोपी विरुद्ध गु.र.नं. 191/2025 कलम 12(अ) म.जु.का. सहकलम 49, 112 भा.दं.वि. अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई IPS अनिकेत हिरडे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण पथकाने केली. सदर पथकात पोउपनि भीष्मराज सोरते, पोउपनि हाके, स.फौ. किशोर तुमराम, पो.हवा विकी, पो.अं. शफीक शेख, पो.अं. महेश बोलगोडवार, पो.अं. शरद राठोड, पो.आ. आनंद मोरे व पो.आ. तिरुपती जाधव यांचा समावेश होता.

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top