Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author
Title: MIDC राजुरा येथे पुन्हा IPL ऑनलाईन सट्टा बेटिंगवर पोलिसांचा छापा
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
MIDC राजुरा येथे पुन्हा IPL ऑनलाईन सट्टा बेटिंगवर पोलिसांचा छापा लाखोंचा मुद्देमाल जप्त! तीन आरोपी अटकेत एक फरार आमचा विदर्भ - दीपक शर्मा रा...
MIDC राजुरा येथे पुन्हा IPL ऑनलाईन सट्टा बेटिंगवर पोलिसांचा छापा
लाखोंचा मुद्देमाल जप्त! तीन आरोपी अटकेत एक फरार
आमचा विदर्भ - दीपक शर्मा
राजुरा (दि. 14 एप्रिल 2025) -
        आयपीएल 2025 स्पर्धेतील मुंबई इंडियन्स विरुद्ध दिल्ली डेअरडेव्हिल्स सामन्यावर ऑनलाईन बेटिंग सट्टा लावणाऱ्या टोळीवर राजुरा पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. बामणवाडा येथील विहान रेस्टॉरंटच्या मागे सुरू असलेल्या ऑनलाईन जुगारावर पोलिसांनी छापा टाकून चौघा आरोपींना अटक केली असून, एक आरोपी फरार आहे. एकूण एक लाख रुपयांचा मोबाईल मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

        13 एप्रिल 2025 रोजी राजुरा पोलिसांना गोपनीय माहिती मिळाली होती की, एमआयडीसी परिसरात काही इसम आयपीएल सामन्यावर ऑनलाईन सट्टा खेळत आहेत. माहितीच्या आधारे पोलिसांनी वरील ठिकाणी धाड टाकली असता आरोपी मोबाईल आयडीवरून हार-जीतचे सट्टे लावताना आढळून आले. या कारवाईत पोलिसांनी तात्काळ सट्टा उपकरणे व मोबाईल जप्त करून आरोपींना अटक केली. या प्रकरणी राजुरा पोलीस ठाण्यात गुन्हा क्र. 190/2025 नोंदवण्यात आला असून, आरोपींवर कलम 12 (अ) महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायदा व कलम 49, 112 भारतीय दंड विधान अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कारवाईत पोलिसांनी ऋषिक उर्फ सोनू धनराज चूनारकर वय 25, रा. चुनाळा, आवेश जावेद शेख वय 24, रा. भारत चौक, राजुरा, संजय श्रीरंग कोडापे वय 26, रा. चुनाभट्टी वॉर्ड, राजुरा याना अटक केली तर स्वप्निल लांडे रा. राजुरा याचा पोलीस शोध घेत आहे. पोलिसांनी आरोपीतांकडून Vivo V30 मोबाईल किंमत 20 हजार, iPhone 13 Pro Max किंमत 50 हजार, Vivo V23 मोबाईल किंमत 30 हजार असा एकूण एक लाखाचा मुद्देमाल जप्त केला. 

        सदरची कारवाई IPS अनिकेत हिरडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक भीष्मराज सोरते, पोलीस उपनिरीक्षक पांडुरंग हाके, फौजदार किशोर तुमराम, पो.हवा विकी, शरद राठोड, महेश बोलगोडवार, शफिक शेख, आनंद मोरे, तिरुपती जाधव यांनी केली. पोलिसांच्या या धडक कारवाईमुळे परिसरात गैरकायदेशीर सट्टा व जुगारावर अंकुश बसेल, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे. फरार आरोपीचा शोध सुरू असून, लवकरच त्यालाही अटक करण्यात येईल, अशी माहिती पोलिसांनी दिली.

14 Apr 2025

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

Emoticon
:) :)) ;(( :-) =)) ;( ;-( :d :-d @-) :p :o :>) (o) [-( :-? (p) :-s (m) 8-) :-t :-b b-( :-# =p~ $-) (b) (f) x-) (k) (h) (c) cheer
Click to see the code!
To insert emoticon you must added at least one space before the code.

 
Top