राजुरा येथील ''संविधान चौकात उसळला जनसागर''
आमचा विदर्भ - निशा मोहुर्ले
राजुरा (दि. १४ एप्रिल २०२५) -
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म १४ एप्रिल १८९१ रोजी झाला. ते भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, महान अर्थशास्त्रज्ञ, विधिज्ञ, समाजसुधारक आणि दलितांमध्ये नवचैतन्य निर्माण करणारे महामानव होते. त्यांनी "शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा" हा मंत्र देऊन वंचित समाजाला न्याय आणि अधिकार मिळवून दिला. त्यांच्या नेतृत्वाखाली भारतात पहिल्यांदाच संविधान तयार झाले, जे आजही लोकशाहीचा आधार आहे. त्यांनी महिलांचे हक्क, कामगारांचे कल्याण, धर्मनिरपेक्षता, आणि सामाजिक न्यायासाठी मोठे योगदान दिले. त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ दरवर्षी १४ एप्रिल रोजी संपूर्ण भारतात अभिवादन आणि विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन केले जाते.
भारतरत्न, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, सामाजिक समतेचे प्रतीक, प्रज्ञासूर्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त येथील संविधान चौकात अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. “शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा” हा त्यांच्या जीवनाचा मूलमंत्र आजच्या नव्या पिढीसाठी प्रेरणादायी ठरत आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
पहाटेपासूनच संविधान चौकात नागरिकांची गर्दी उसळली होती. विविध ठिकाणांहून आलेल्या अनुयायांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना वंदन केले. या कार्यक्रमात आमदार देवराव भोंगळे, चंद्रपूर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष माजी आमदार सुभाष धोटे, माजी आमदार अँड. वामनराव चटप, माजी आमदार अँड. संजय धोटे, माजी आमदार सुदर्शन निमकर, माजी नगराध्यक्ष अरूण धोटे, माजी नगराध्यक्ष रमेश नळे, स्वामी येरोलवार, अँड. अरुण धोटे, सिध्दार्थ पथाडे, डॉ. सत्यपाल कातकर, जेष्ठ भाजप नेते सतिश धोटे, माजी नगरसेवक गजानन भटारकर, सुनील रामटेके, अरुण मस्की, मधुकर चिंचोलकर, कपील इद्दे, आदिवासी नेते वाघुजी गेडाम, महादेव तपासे, संदेश करमनकर, अमोल राऊत, संतोष गटलेवार, संघपाल देठे, प्रियदर्शनी उमरे, तुळजाबाई खडसे, शितल बनसोड, कांचन बारसिंगे, आदित्य भाके, संजय रामटेके यासह अनेक मान्यवर, महिला वर्ग, नागरिक मोठय़ा संख्येने उपस्थित होते. यांच्यासह अनेक मान्यवरांची उपस्थिती होती. कार्यक्रमात महिला वर्ग, युवक व नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. पुष्पहार अर्पण, घोषवाक्य, जय घोष, सामूहिक अभिवादन करण्यात आले. या कार्यक्रमाच्या माध्यमातून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी समाजाच्या सर्व स्तरांतील वंचित घटकांना मिळवून दिलेल्या हक्कांचे स्मरण करण्यात आले. संविधान, सामाजिक समता, बौद्धिक संपदा आणि न्यायाच्या मूल्यांची आठवण करून देणाऱ्या या कार्यक्रमाने नवचैतन्याचा संदेश दिला.
टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.