आमचा विदर्भ - दीपक शर्मा
राजुरा (दि. १४ एप्रिल २०२५) -
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३४व्या जयंतीनिमित्त ग्रामपंचायत चुनाळा येथे प्रियदर्शिनी इंदिरा गांधी सांस्कृतिक सभागृहात मोठ्या उत्साहात कार्यक्रम पार पडला. प्रारंभी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी अनुसूचित जाती प्रवर्गातून चंद्रपूर जिल्ह्यात तिसरा क्रमांक पटकावत नवोदय विद्यालयात निवड झालेल्या कु. रेहांशी मिलिंद जवादे हिचा विशेष सत्कार करण्यात आला. रेहांशी हिच्या या उल्लेखनीय यशाबद्दल ग्रामपंचायत चुनाळा तर्फे आयोजित कार्यक्रमात माजी आमदार सुदर्शन निमकर यांच्या शुभहस्ते आणि कार्यक्रमाच्या अध्यक्ष बाळनाथ वडस्कर व सरपंच यांच्या अध्यक्षतेखाली शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ व स्मृतिचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. या कार्यक्रमात गावकऱ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला. उपस्थित मान्यवरांनी रेहांशीच्या यशाबद्दल गौरवोद्गार काढून तिचे भविष्य उज्ज्वल होवो, अशा शुभेच्छा दिल्या. या यशामागे तिचे आई-वडील, शिक्षक आणि संपूर्ण कुटुंबाचे मोलाचे योगदान असल्याचे यावेळी नमूद करण्यात आले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त गावात हर्षोल्हासाचे वातावरण होते. माजी आमदार सुदर्शन निमकर यांनी तथागत गौतम बुद्ध व महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना पुष्पांजली अर्पण करून अभिवादन केले.
टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.