Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: वीर बाबुराव शेडमाके चौकात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहात साजरी
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
वीर बाबुराव शेडमाके चौकात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहात साजरी आदिवासी समाजाची एकत्रित उपस्थिती आमचा विदर्भ - दीपक शर्मा राजुरा ...
वीर बाबुराव शेडमाके चौकात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहात साजरी
आदिवासी समाजाची एकत्रित उपस्थिती
आमचा विदर्भ - दीपक शर्मा
राजुरा (दि. 16 एप्रिल 2025) -
महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 134 वी जयंती वीर बाबुराव शेडमाके चौक, बेगर वस्ती येथे मोठ्या उत्साहात व अभिमानाने साजरी करण्यात आली. या कार्यक्रमाचे आयोजन वीर बाबुराव शेडमाके स्मारक समिती, बेगर वस्ती यांच्या वतीने करण्यात आले होते. कार्यक्रमात आदिवासी बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून डॉ. आंबेडकर यांना अभिवादन केले. उपस्थितांनी त्यांचं जीवनकार्य व विचारांचा गौरव करत एकात्मतेचे प्रतीक म्हणून या जयंतीचा उत्सव साजरा केला.

        या कार्यक्रमात रविंद्र आर.पी. आत्राम, राकेश उईके, किसान आत्राम, कवडू आत्राम, प्रसाद मेश्राम, पिंटू मडावी, दवलत वनकर, बंडू मेश्राम, संतोष मडावी यांच्यासह अनेक आदिवासी समाजबांधव आणि जय भीम समाजाचे सदस्य उपस्थित होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांवर प्रेरित होऊन समाजात शिक्षण, समता आणि सामाजिक न्याय यांचा प्रसार व्हावा, असा संदेशही यावेळी देण्यात आला.

About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top