भटाडी कोळसा खाणीत दुर्घटना
कन्व्हेयर बेल्टमध्ये अडकून कामगार गंभीर जखमी
आमचा विदर्भ - दीपक शर्मा
चंद्रपूर (दि. 16 एप्रिल 2025) -
तिरवंजा गावाजवळील भटाडी कोळसा खाणीत सोमवारी दुपारी सुमारे चारच्या सुमारास एक गंभीर दुर्घटना घडली. चंद्रपूर थर्मल पॉवर स्टेशनला कोळसा पोहोचवणाऱ्या कन्व्हेयर बेल्टमध्ये काम करत असताना निलेश पिंगे (कामगार) हे अडकून गंभीर जखमी झाले. सध्या त्यांच्यावर चंद्रपूरच्या एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरू असून प्रकृती चिंताजनक आहे.
मिळलेल्या माहितीनुसार, क्रशर मशीनमध्ये अडकलेला कोळसा काढण्यासाठी निलेश पिंगे हे कन्वेयरवर चढले होते. कोळसा अचानक मोकळा होताच कन्वेयर बेल्ट आपोआप सुरू झाला आणि निलेश यांच्या डोक्याचा भाग थेट बेल्टमध्ये अडकला. त्यामुळे त्यांना गंभीर स्वरूपाची दुखापत झाली. तिरवंजा खाणीतून थर्मल पॉवर स्टेशनपर्यंत कोळसा पोहोचवण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या कन्वेयर बेल्टची देखभाल कंत्राटी पद्धतीने केली जाते. मात्र, कंत्राटदार मोजक्या कामगारांवरच कामाचे ओझे टाकतो आणि सुरक्षेची कोणतीही हमी न देता काम करायला लावतो, असा आरोप कर्मचारी वर्तुळातून करण्यात येत आहे.
ही दुर्घटना घडल्यामुळे कोळसा खाणीत काम करणाऱ्या मजुरांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. वरिष्ठ अधिकारी याकडे सातत्याने दुर्लक्ष करत असल्याचा आरोप असून, संबंधित यंत्रणांनी या प्रकाराची गंभीर दखल घेऊन दोषींवर तातडीने कारवाई करावी, अशी मागणी कामगार संघटनांकडून होत आहे.
टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.