Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author
Title: Mahashivratri महाशिवरात्री निमित्य प्राचीन सोमेश्वर मंदिरात उसळली भक्तांची अलोट गर्दी
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
Mahashivratri महाशिवरात्री निमित्य प्राचीन सोमेश्वर मंदिरात उसळली भक्तांची अलोट गर्दी तीन दिवस विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन तहसीलदार डॉ...
Mahashivratri
महाशिवरात्री निमित्य प्राचीन सोमेश्वर मंदिरात उसळली भक्तांची अलोट गर्दी
तीन दिवस विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन
तहसीलदार डॉ. ओमप्रकाश गोंड यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून झाली भजनांची सुरुवात
आमचा विदर्भ - अनंता गोखरे
राजुरा (दि. २६ फेब्रुवारी २०२५) -
        महाशिवरात्री निमित्त प्राचीन सोमेश्वर मंदिरात भक्तांची अलोट गर्दी उसळली. या दिवशी मंदिर परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले. श्रध्दाळू भक्तांनी मोठ्या उत्साहात सामील होत महादेवाचे पूजन केले. तहसीलदार डॉ.ओमप्रकाश गोंड यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून भजन मंडळांनी भजनांच्या कार्यक्रमाला सुरुवात केली. सकाळपासूनच मंदिर परिसरात भजन सुरु होते. जवळपास २० पेक्षा अधिक भजन मंडळाने भजनांत सूर आणला. अनेक भक्तांनी धार्मिक विधीसह अतिशय श्रद्धेने सहभाग घेतला, शहरातील सर्वच शिव मंदिरात भक्तिमय वातावरण असून भक्ति व श्रद्धेचा अनुभव घेतला जात होता. महाशिवरात्रीच्या या पवित्र दिवशी सोमेश्वर मंदिराने एकत्रित केलीली भक्तांची ही गर्दी आणि धार्मिक उपायोजना यामुळे संपूर्ण परिसरात आध्यात्मिकता भरून राहिली. दर्शनाकरिता आलेल्या हजारों शिवभक्तांना दूध, साबुदाणा खिचडी, केळी व राजगिऱ्याच्या लाडूचे वितरण करण्यात आले. 
        प्राचीन सोमेश्वर मंदिरात माजी आमदार सुभाष धोटे. माजी नगराध्यक्ष सामी येरोळवार, सहाय्यक पोलिस निरीक्षक हेमंत पवार, नप प्रशासकीय अधिकारी विजय जांभुळकर, सुभाष रामगिरवार, विलास कुंदोजवार, श्रीरंग ढोबळे, मोनू देशकर, अविनाश दोरखंडे तसेच शहरातील प्रतिष्ठित नागरिक, व्यापारी व हजारो शिवभक्त महिला, पुरुष व बालगोपाळांनी महादेवाचे दर्शन घेतले. यावेळी सोमेश्वर मंदिर देवस्थान देखरेख समितीचे अध्यक्ष मारोतराव येरणे, उपाध्यक्ष प्रकाश बेजंकिवार, सचिव भाऊराव बोबडे, सहसचिव प्रशांत गुंडावार, भाऊराव खाडे, रामचंद्र आदे, बापूजी कुचनकर, यशवंत पवार, नेफाडो चे बादल बेले, श्री सोमेश्वर युवक सेवा मंडळाचे पंढरी लोहे, नितीन मेंढे, किरीट बोलम, अमोल झाडे, अरविंद वाघाडे, संदिप आदे आदींसह प्रमुख पदाधिकारी यांची उपस्थिती होती. 
        तीन दिवस भक्तिमय वातावरणात हा महाशिवरात्री उत्सव सुरु राहणार आहे. २७ फेब्रुवारीला सायंकाळी ७ वाजता हभप विवेक महाराज कुरुमकर, राष्ट्रीय कीर्तनकार, ग्रामगीता प्रचारक वडगांव ता. मूर्तिजापूर जिल्हा अकोला यांचें समाजप्रबोधनावर जाहीर कीर्तन आयोजित करण्यात आले आहे. तसेच २८ फेब्रुवारीला सकाळी अग्निकुंडाचा कार्यक्रम होणार आहे. या खास उपक्रमात भक्तांनी अग्नीतून चालण्याची तयारी केली आहे, ज्यामुळे हा कार्यक्रम अधिक आकर्षक आणि श्रध्देने भरलेला असेल. अग्निकुंडाचा कार्यक्रम हा पुरातन परंपरेचा भाग आहे, ज्यामध्ये भाविक अग्नीतून चालून आपल्या श्रद्धेचा प्रदर्शन करतात. अग्नीच्या रखरखत्या निखाऱ्यातून चालणे ही एक आव्हानात्मक परंतु आध्यात्मिकोपाय असल्याने, भक्त आपल्या आत्मविश्वास आणि श्रद्धेवर या उपक्रमात भाग घेतात. हा कार्यक्रम धार्मिक, सांस्कृतिक आणि मानसिक दृष्ट्या अविस्मरणीय अनुभव ठरतो, कारण यामध्ये भक्तांच्या मनोबलाची परीक्षा घेतली जाते. अग्निकुंडात चालण्यासाठी भक्त आदर्श मनःस्थितीत असतात आणि त्यात सहभागी होण्यासाठी अनेक भक्त उत्सुकतेने प्रतीक्षेत असतात.

हि बातमी वाचली का ?

        महाशिवरात्री निमित्य नगर परिषद, पोलिस विभाग, होमगार्ड्स, सोमेश्वर मंदिर युवक सेवा मंडळ, नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्था आदींसह शहरातील सेवाभावी नागरीकांचे सहकार्य लाभले.

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top