marathi bhasha gaurav din
आमचा विदर्भ - अनंता गोखरे
राजुरा (दि. २८ फेब्रुवारी २०२५) -
ब्लॅक डायमंड इंटरनॅशनल प्री स्कूल आणि सनराइज इंग्लिश प्रायमरी स्कूलमध्ये मराठी भाषा गौरव दिन उत्साहाने साजरा करण्यात आला. या प्रसंगी, ज्येष्ठ साहित्यिक कवी कुसुमाग्रज यांच्या साहित्याची ओळख विद्यार्थ्यांना करून देण्यात आली. मुलांनी मराठी कविता सादर केल्या आणि गोष्टी सांगितल्या, ज्यामुळे त्यांच्या भाषिक कौशल्यांचा विकास झाला. (Black Diamond International Pre School and Sunrise English Primary School)
शाळेत प्ले स्कूल ते इयत्ता पहिलीपर्यंतचे वर्ग आहेत, तसेच शिक्षण सिंगापूर पद्धतीवर आधारित आहे. विद्यार्थ्यांना रंग, आकार, दिवस, वार, महिने आणि विविध संस्कृतींचे सण-समारंभ प्रत्यक्ष उपक्रमांद्वारे शिकवले जातात. या उपक्रमांमुळे मुलांना बालवयातच आनंदी वातावरणात शिक्षण मिळते, ज्यामुळे शाळेने अल्पावधीतच चांगली प्रतिष्ठा मिळवली आहे.
या यशस्वी उपक्रमांसाठी शाळेचे सल्लागार सदस्य संदीप मालेकर आणि जयश्री मालेकर, केंद्र संचालक अँड. मनोज काकडे, शाखा प्रमुख शुभांगी धोटे तसेच सहाय्यक शिक्षिका आलिशा सय्यद, प्रीती सिंग, आयेशा कुरेशी, फिजा शेख, मानसी मॅडम आणि मदतनीस ममता, अर्चना व सुषमाताई यांचे योगदान महत्त्वपूर्ण आहे. पालकांनी या उपक्रमांबद्दल समाधान व्यक्त केले आहे आणि शाळेच्या शिक्षण पद्धतीची प्रशंसा केली आहे.
टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.