Criminal arrest in Chandrapur
फरार बंदी शोध मोहिमेत दोघांना अटक
आमचा विदर्भ - अनंता गोखरे
चंद्रपूर (दि. २८ फेब्रुवारी २०२५) -
पोलीस स्टेशन रामनगर येथील खुनाच्या गुन्हयात नागपूर मध्यवर्ती कारागृह शिक्षा भोगत असतांना बंदी नामे विकास उर्फ विक्की बद्रीप्रसाद तिवारी रा. इंदिरानगर चंद्रपूर हा दि. ८ मे २०२० रोजी ४५ दिवसाच्या कोरोना आकस्मिक अभिवचन रजेवर असतांना विहीत वेळेवर कालावधीत कारागृहात परत न येता अनाधिकृतपणे फरार असल्याने त्याचेविरुद्ध पोलीस स्टेशन रामनगर येथे कलम २२४ भादंवि प्रमाणे नोंदविण्यात आला होता.
त्याचप्रमाणे राजुरा येथील गुन्हयात शिक्षा भोगत असलेला बंदी नामे दिपक उर्फ सुरेश यशवंत पुणेकर रा. राजुरा हा सुध्दा रजेवरुन अनाधिकृतपणे फरार होता. पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन आणि अपर पोलीस अधीक्षक रिना जनबंधु यांचे मार्गदर्शनात चंद्रपूर जिल्हयात फरार बंदी शोध मोहिम राबवण्यात आली असतांना स्थानिक गुन्हे शाखा चंद्रपूर चे पोलीस निरीक्षक अमोल काचोरे यांचे नेतृत्वात स्थानिक गुन्हे शाखेचे शोध पथकाने सदर फरार बंदी नामे विकास उर्फ विक्की बद्रीप्रसाद तिवारी आणि बंदी नामे दिपक उर्फ सुरेश यशवंत पुणेकर यांचा कसोशीने शोथ लावुन त्यांना ताब्यात घेवुन संबंधीत पोलीस स्टेशनचे स्वाधिन केले. त्यांची वैद्यकीय तपासणी करत दोघांना मध्यवर्ती कारागृह नागपूर येथे पाठविण्यात आले आहे. सदरची कार्यवाही वरिष्ठांच्या मार्गदर्शनात सपोनि दिपक कांकेडवार, सफौ स्वामीदास चालेकर, पोहवा प्रकाश बलकी, अजय बागेसर, किशोर वैरागडे, पो.अं. नरोटे व चापोहवा अराडे यांनी केली.
टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.