Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author
Title: University Campus Ambassador गौरी मोहन भारती बनली NSUI ची नवीन युनिव्हर्सिटी कॅम्पस अॅम्बेसॅडर
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
University Campus Ambassador गौरी मोहन भारती बनली NSUI ची नवीन युनिव्हर्सिटी कॅम्पस अॅम्बेसॅडर आमचा विदर्भ - धनराजसिंह शेखावत, प्रतिनिधी गडच...
University Campus Ambassador
गौरी मोहन भारती बनली NSUI ची नवीन युनिव्हर्सिटी कॅम्पस अॅम्बेसॅडर
आमचा विदर्भ - धनराजसिंह शेखावत, प्रतिनिधी
गडचांदूर -
        नॅशनल स्टुडंट्स युनियन ऑफ इंडिया (NSUI) ने राज्यातील विविध विद्यापीठांसाठी कॅम्पस अॅम्बेसॅडरची नियुक्ती जाहीर केली आहे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठातून विधी महाविद्यालयाच्या विद्यार्थीनी गौरी मोहन भारती हिला युनिव्हर्सिटी कॅम्पस अॅम्बेसॅडर म्हणून नियुक्त करण्यात आले आहे.

NSUI कडून अधिकृत पत्र जारी
        या नियुक्तीबाबतचे अधिकृत पत्र भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे आणि NSUI चे राष्ट्रीय अध्यक्ष वरुण चौधरी यांनी नुकतेच जारी केले आहे. या निवडीमुळे गौरी मोहन भारती यांना नागपूर विद्यापीठातील विद्यार्थ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी आणि त्यांचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळणार आहे.

विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण
        गौरी भारती यांच्या निवडीमुळे नागपूर विद्यापीठ आणि विशेषतः विधी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. विद्यार्थ्यांच्या हक्कांसाठी आणि त्यांच्या अडचणी सोडवण्यासाठी त्या महत्त्वाची भूमिका बजावतील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top