Mahashivratri Prasad Distribution
आमचा विदर्भ - धनराजसिंह शेखावत, प्रतिनिधी
गडचांदूर (दि. २६ फेब्रुवारी २०२५) -
महाशिवरात्रीच्या पावन पर्वावर माणिकगड पर्वतावरील शंकरदेव मंदिरात दरवर्षी यात्रा भरते. या यात्रेसाठी हजारो भाविक भक्त शंकरदेवाच्या दर्शनासाठी अलोट गर्दी करतात. यात्रेकरूंच्या सेवा भावनेतून गडचांदूर येथील आंबेडकर चौकात, छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ सुनील झाडे व महादेव हेपट यांच्या वतीने येणाऱ्या हजारों भाविकांना साबुदाणा खिचडीचे वाटप करण्यात आले.
यावेळी हंसराज चौधरी, नोगराज मंगरूळकर, रऊफ खान वजीरखान, विठ्ठल थिपे, अशोक बावणे, सचिन भोयर, आशिष देरकर, शैलेश लोखंडे, संतोष महाडोळे, अक्षय गोरे, पवन राजूरकर, रोहित शिंगाडे, संजय रणदिवे, राकेश शेंद्रे, गणेश सातपाडे, प्रवीण देवलवार, प्रणित अहिरकर, प्रणय पानघाटे, श्रीनिवास पवार, सागर मसे, मुक्तार अली, अमन निजामी, गुणवंत खोके, विशाल राव, हिमांशू गोरे, सुहास बोढे, राजीव बिस्वास, सुयोग भोयर, अतुल बोबडे, दशरथ जुमनाके, ऋषी चटप, शुभम बावणे, संकेत लांडे, हरि कुरेकर, दत्तू पानघाटे, मयूर येडमे आदी उपस्थित होते. महाशिवरात्री निमित्ताने भाविक भक्तांसाठी आयोजित या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक केले जात असून, यात्रेकरूंसाठी हे सेवाकार्य प्रेरणादायी ठरले आहे.
टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.