Youth drowned in Wardha river
वर्धा नदीवर आंघोळीला गेलेले तिन तरूण पाण्यात बुडाले
आमचा विदर्भ - दीपक शर्मा
राजुुरा (दि. २६ फेब्रुवारी २०२५) -
राजुरा तालुक्यातील चुनाळा गावातील तिन युवक महाशिवरात्री निमीत्त आंघोळ करण्यासाठी वर्धा नदीवरील चुनाळा घाट भागात गेले होते. यावेळी आंघोळीसाठी नदीपात्रात उतरलेल्या या तरूणांना पाण्याचा अंदाज न आल्याने ते पाण्यात बुडाले. आज दिनांक 26 फेब्रुवारी ला दुपारी 12-30 वाजताच्या सुमारास ही घटना घडली. यामुळे चुनाळा गावात शोककळा पसरली आहे. घटनेची माहिती मिळताच राजुरा पोलिस तातडीने घटनास्थळी आले आणि त्यांनी बेपत्ता युवकांचा शोध सुरू केला. चंद्रपूर येथून बोट बोलविण्यात आली असून शोध सुरू आहे. स्थानिक मच्छीमारांच्या बोटीही शोध घेत आहेत. या घटनेतील युवक राजुरा क्षेत्रातील असले तरी घटनास्थळ बल्लारपूर पोलिस ठाणे अंतर्गत येत असल्याने बल्लारपूर पोलिस शोध घेत आहेत. सायंकाळी साडे पाच वाजेपर्यंत बेपत्ता युवकांचा शोध लागला नसल्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक हेमंत पवार यांनी सांगितले.
हि बातमी वाचली का ?
या घटनेतील दुर्देवी तरूणांची नावे मंगेश बंडू चणकापुरे, वय 20, अनिकेत शंकर कोडापे, वय 18 आणि तुषार शालिक आत्राम, वय 17 अशी आहेत. हे सर्व युवक चुनाळा येथील रहिवासी आहेत. हे युवक येतांना काहींनी या भागात डोह असल्याने न जाण्याविषयी सांगितले, मात्र त्यांनी मानले नाही. मिळालेल्या माहितीनुसार सर्वप्रथम एका महिलेने या युवकांना पाण्यात बुडत असल्याचे बघून आरडओरडा केला. तेव्हा शिवारातील शेतकरी धावून आले, मात्र तोपर्यंत हे तिन्ही युवक नदीच्या पाण्यात दिसेनासे झाले होते. यावेळी रामचंद्र रागी नामक शेतकऱ्याने गावकऱ्यांना माहिती दिली. दरम्यान पोलिस व तहसिल कार्यालयातील आपत्ती व्यवस्थापनाचे कर्मचारी घटनास्थळी असून चंद्रपूर येथून आलेल्या बोटीद्वारे व स्थानिक मच्छीमारांच्या बोटीद्वारे बेपत्ता युवकांचा शोध सुरू आहे.
टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.