Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author
Title: पंचाळा गावात भीषण आगीत घर जळून खाक
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
पंचाळा गावात भीषण आगीत घर जळून खाक आगीनंतर सिलिंडरचा स्फोट, घर बेचिराख मोलमजुरी करणारे कुटुंब उघड्यावर आमचा विदर्भ - निशा मोहुर्ले, शहर प्रत...
पंचाळा गावात भीषण आगीत घर जळून खाक
आगीनंतर सिलिंडरचा स्फोट, घर बेचिराख
मोलमजुरी करणारे कुटुंब उघड्यावर
आमचा विदर्भ - निशा मोहुर्ले, शहर प्रतिनिधी
राजुरा (दि. २६ फेब्रुवारी २०२५) -
        राजुरा तालुक्यातील पंचाळा गावातील भूपाल निरंजन कुळमेथे यांचे घराला 24 फेब्रुवारीचा सायंकाळी लागलेल्या आगीत जळून खाक झाले. या दुर्घटनेत प्राणहानी टळली असली तरी रोख रक्कम, बकऱ्या व त्यांच्या पिल्लांची अक्षरश: राख झाली. घरी लावलेल्या दिव्याच्या वातीमुळे हा प्रकार घडल्याचे सांगितले जात आहे.

        भूपाल निरंजन कुळमेथे हे मूळ पोंभुर्ण्याचे रहिवासी असून ते मोलमजुरी करण्यासाठी पंचाळा गावात रहायला आले. घटनेच्या दिवशी घरचे सर्व सदस्य काही कार्यक्रमासाठी घराबाहेर गेले होते. घरी मुलगी व मुलगाच होता. मुलीने दिवा लावल्यानंतर दोन्ही भाऊ बहीण शेजाऱ्याच्या येथे गेली. यावेळी अचानक घरात आग लागली. आगीने सिलेंडर गॅसचा स्फोट झाला. यात बकऱ्यांसह त्यांच्या पिल्यांचा होरपळून मृत्यू झाला. या आगीत घरात असलेले साहित्य व रोख रक्कम जळून खाक झाली. सोबतच मुलीचे शैक्षणिक कागदपत्र जळाली. आगीमुळे गरीब कुटूंबावर आभाळ कोसळले आहे. दिव्याची जळत असलेली वात उंदीराने नेल्याने ही घटना घडली असावी असा अंदाज व्यक्त करण्यात येत असला तरी आग कशामुळे लागली हे कळू शकले नाही. घटनेची माहिती उपसरपंच आकाश चोथले व गावकऱ्यांनी तहसीलदार ओमप्रकाश गोंड यांना देऊन नुकसान भरपाई देण्याची मागणी केली आहे.

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top