suicide ; रेल्वे रुळावर कटून इसमाची आत्महत्या
आमचा विदर्भ - अविनाश रामटेके, प्रतिनिधी
विरूर स्टेशन (दि. 25 फेब्रुवारी 2025) -
साऊथ सेंट्रल रेल्वेच्या थोमपूर रेल्वे गेट जवळील रेल्वे रुळावर एका 55 वर्षीय इसमाचा कटलेल्या अवस्थेत मृत्यूदेह आढल्याने एकच खळबळ उडाली असून या अगोदर मागील दीड महिन्यांपूर्वी निलेश डवरे याचा मृत्यूदेह ही संशयास्पद स्थितीत रेल्वे रुळावर आढळून आल्याने त्याचा घातपात की आत्महत्या हे गूढ अजुनही कायम असून या नवीन घटनेमुळे पोलिसांसमोर पुन्हा आवाहन तर उभे होइल का? अशी चर्चा नागरिकांत होताना दिसून येत आहे. (South Central Railway) (wirur police station)
राजुरा तालुक्यातील चिंचोली (बु) येथील दिनकर लटारू कडुकर वय 55 वर्षे यांनी काल घरून बाहेर जातो म्हणून सायंकाळी चार वाजताच्या सुमारास घरून निघून गेला मात्र दुसऱ्या दिवशी सकाळ पर्यंत घरी न पोहचल्याने कुटुंबातील नातेवाईक यांनी शोधाशोध सुरू केले. मात्र त्याचा पत्ता लागला नाही. थोमापूर रेल्वे गेट जवळील खांब क्र 162/30 ते 162/32 रेल्वे क्रॉसिंग वर रेल्वेने कटलेला मृतदेह आढल्याने रेल्वे कर्मचाऱ्यांनी सदर घटनेची माहिती पोलिसांना दिली. तपासादरम्यान सदर मृत्यूदेह हा दिनकर चा असल्याचे निष्पन्न झाल्याने त्याच्या नातेवाईकांना ओळख पटविण्यासाठी बोलविले असता सदर मृत्यूदेह हा दिवकरचा असल्याचे कुटुंबाकडून सांगण्यात आल्याने विरूर पोलिसांनी घटनेचा पंचनामा करून आकस्मिक मृत्यूची नोंद करून मर्ग दाखल केला व मृत्यूदेह शवविच्छेदन साठी राजुरा येथे पाठविण्यात आला. सदर तपास हा ठाणेदार संतोष वाकळे यांच्या मार्गदर्शनाखाली हेड कॉन्स्टेबल सुनील मेश्राम हे करीत आहे.
टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.