Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author
Title: Illegal animal transport जनावरांची अवैध वाहतुक ; जिल्हयात तीन गुन्हे दाखल ; २७ जनावरांची सुटका
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
Illegal animal transport जनावरांची अवैध वाहतुक ; जिल्हयात तीन गुन्हे दाखल ; २७ जनावरांची सुटका राजुरा व विरूर पोलिसांची धडक कारवाई आमचा विदर...
Illegal animal transport
जनावरांची अवैध वाहतुक ; जिल्हयात तीन गुन्हे दाखल ; २७ जनावरांची सुटका
राजुरा व विरूर पोलिसांची धडक कारवाई
आमचा विदर्भ - दीपक शर्मा
चंद्रपूर / राजुरा (दि. २५ फेब्रुवारी २०२५) -
        चंद्रपूर जिल्ह्यात जनावरांची अवैध वाहतूक (Illegal transportation of animals) करणाऱ्या विरोधात तीन गुन्हे दाखल झाले असून २२ लाख ५० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. 

        २५ फेब्रुवारी २०१५ रोजी गोपनिय माहितीवरुन (police station wirur) पोलीस ठाणे विरुर हद्दीत दोन वेगवेगळ्या ठिकाणी जनावरांची अवैध वाहतुक करीत असलेल्या विरुध्द कार्यवाही करुन पोलीस ठाणे विरुर येथे कलम ५ (ब), ९, ११ महाराष्ट्र प्राणि संरक्षण अधिनियम १९७६, सहकलम ११ (१) (ई) प्राण्यांना निर्दयतेने वागविण्यास प्रतिबंध अधिनियम १९६० अन्वये अनुक्रमे अपराध क्रमांक २०/२०२५ आणि अपराध क्रमांक २१/२०२५ असे दोन गुन्हयाची नोंद करण्यात आली. त्यात अप.क्र. २०/२०२५ मध्ये एक टाटा पिकअप क्रं. एमएच ३४ बी झेड ५४३१ मध्ये एकुण ६ जनावरे (बैल) किंमत ७२ हजार रुपये व वाहन किंमत ७ लाख असा एकुण ७ लाख ७२ हजार रुपयांचा मुद्देमाल आणि अप.क्र. २१ / २०२५ मध्ये एक टाटा योध्दा पिकअप क्रं. एमएच ३० बीडी १६८९ मध्ये एकुण १० जनावरे (बैल) किंमत ७० हजार रुपये व वाहन किंमत ७ लाख असा एकुण ७ लाख ७० हजार रुपयाचा मुद्देमाल मिळुन आला आहे.
         तसेच २५ फेब्रुवारी, २०२५ रोजी गोपनिय माहितीवरून (police station rajura) पोलीस ठाणे राजुरा हद्दीत मौजा सोंडो येथे जनावरांची अवैध वाहतुक करणाऱ्यांविरुध्द कार्यवाही करुन पोलीस ठाणे राजुरा येथे कलम ५ (ब), ९, ११ महाराष्ट्र प्राणि संरक्षण अधिनियम १९७६, सहकलम ११ (१) (ई) प्राण्यांना निर्दयतेने वागविण्यास प्रतिबंध अधिनियम १९६०, सहकलम ६६ / १९२ मो. वा. का. अन्वये गुन्हा नोंद करुन वाहन पिकअप क्रं एमएच ३४ बीझेड ७२७८ मध्ये एकुण ११ जनावरे (गौवंश ) किंमत १ लाख १० हजार रुपये व वाहन किंमत ६ लाख असा एकुण ७ लाख १० हजार रुपयाचा मुद्देमाल मिळुन आला आहे.

        सदरची कारवाई पोलीस अधीक्षक मुमम्का सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक रिना जनबंधू, उपविभागीय पोलीस अधिकारी दिपक साखरे राजुरा यांचे मार्गदर्शनाखाली पो. ठाणे विरुर येथील सपोनि संतोष वाकडे, पोउपनि पराग उल्लेवार व स्टॉफ यांनी केली आहे, तसेच पो. ठाणे राजुरा येथील सपोनि निशा भुते, पोउपनि हाके, पोअं. पिपरे, पोअं. बालाजी, पोअं. भेंडेकर, पोअं. रमेश यांनी केली आहे.

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top