Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author
Title: Teacher's problem शिक्षकांच्या समस्या सोडविण्याचा प्रयत्न करीत राहील - आमदार सुधाकर अडबाले
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
Teacher's problem शिक्षकांच्या समस्या सोडविण्याचा प्रयत्न करीत राहील - आमदार सुधाकर अडबाले आमचा विदर्भ - दीपक शर्मा राजुरा (दि. २५ फेब्र...
Teacher's problem
शिक्षकांच्या समस्या सोडविण्याचा प्रयत्न करीत राहील - आमदार सुधाकर अडबाले
आमचा विदर्भ - दीपक शर्मा
राजुरा (दि. २५ फेब्रुवारी २०२५) -
        निवडी प्रसंगी (Teacher MLA) शिक्षक आमदार जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांना मतदानाचा अधिकार नसतांना सुध्दा त्यांनी खुप सहकार्य केले याचे भान ठेवून मी (Problems of primary teachers) प्राथमिक शिक्षकांच्या समस्यांना सभागृहात व सभागृहाबाहेर सुध्दा वाचा फोडुन त्या सोडविण्याचा प्रयत्न करीत राहील अशी ग्वाही शिक्षक आमदार सुधाकर अडबाले (MLA Sudhakar Adbale) यांनी सेवानिवृत्त शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी अधिकारी संघटनेच्या जिल्हा अधिवेशनात दिली. (Retired Teachers, Non-Teaching Staff Officers Association) (District Convention)

        याप्रसंगी बोलतांना ते म्हणाले की, यापुर्वी कोणत्याही शिक्षक आमदाराने जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत शिकणाऱ्या विदयार्थ्यांच्या हिताचा विचार केला नाही. मी मागील दोन वर्षापासुन काही जिल्हा परिषद प्राथमिक शाळांना साहित्याचा पुरवठा केलेला आहे. कॅशलेस आरोग्य सुविधा योजना, सेवानिवृत्तांना लागू करण्यात यावी. सेवानिवृत्तीच्या दिवशीच कर्मचाऱ्यांचे जिपीएफ., गटविमा, मिळण्यात यावा अशी मागणी करावी लागणार आहे. त्याचा पाठपुरावा मी करीत राहणार आहे. त्यांच्या हस्ते "कर्तव्यबंध” शिर्षक असलेल्या एका स्मरणीकेचे विमोचन करण्यात आले. अध्यक्षस्थानी संघटनेचे राज्य संघटक सुरेश अनमुलवार हे होते, याप्रसंगी विजय भोगेकर, गणपत विधाते, नारायण कांबळे, सुरेश बोंडे, मनोहर बकाने, केशवराव ठाकरे, दिपक व हेकर यांची प्रमुख उपस्थिती होती.

        प्रास्ताविक गणपत विधाते यांनी तर संचालन सुधाकर कातकर यांनी केले. आभार जयेंद्र राऊत यांनी केले. जिल्हा अधिवेशन यशस्वी करण्याकरीता तालुका अध्यक्ष सुरेश बोंडे, सचिव प्रफुल्ल नगराळे, पांडुरंग नान्ने, प्रभाकर आईटलावार, पुष्पा मेश्राम, आनंदराव बेले, सुनिल जोगी इत्यादींनी प्रयत्न केले.

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top