Eye and Organ Donation Awareness
आमचा विदर्भ - निशा मोहुर्ले, शहर प्रतिनिधी
राजुरा (दि. २५ फेब्रुवारी २०२५) -
श्री शिवाजी कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना पथकाच्या वतीने स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या पुण्यतिथी निमित्य महाविद्यालयातील तरुणांमध्ये नेत्रदान व अवयव दान संदर्भात जागरूकता निर्माण करण्याकरिता नेत्रदान व अवयव दान जागरूकता कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. आपल्या देशात असलेले अंधत्वाचे प्रमाण, नागरिकांमध्ये असलेल्या गैरसमजुती त्यामुळे नेत्रदानाचे आणि अवयव दानाचे प्रमाण खूप कमी आहे. त्यामुळे जनतेमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी असे कार्यक्रम नक्कीच उपयोगी पडतील आणि त्यामध्ये राष्ट्रीय सेवा योजना स्वयंसेवकानी महत्वाची भूमिका पार पाडेल अशी आशा डॉ बुर्हाण यांनी व्यक्त केली. (Shri Shivaji College of Arts, Commerce and Science) (Shivaji College)
डॉ खेरानी यांनी आपल्या भाषणात रासेयो स्वयंसेवकांनी जागरूकता कार्यक्रमात अग्रेसर राहून समाजात जनजागृती करावी व देशाला पुढे नेण्यासाठी प्रयत्न करावे असे आवाहन केले. या कार्यशाळेला प्रमुख मार्गदर्शक म्हणून नेत्रतज्ञ डॉ बुर्हान, अध्यक्ष म्हणून महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ आर आर खेरानी, प्रमुख अतिथी म्हणून डॉ राजेंद्र मुद्दमवार, कार्यक्रम अधिकारी प्रा. गुरुदास बल्की व रासेयो स्वयंसेवक उपस्थित होते, सूत्रसंचालन प्रा गुरुदास बल्की यांनी तर आभार नितीन उमाटे यांनी मानले.
टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.