रामपूर येथील माता मंदिराच्या छतासाठी मदत
विरेद्र पुणेकर - आमचा विदर्भ प्रतिनिधी
राजुरा -
युवासेना प्रमुख शिवसेना नेते मंत्री आदित्यसाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्य तालुक्यात विविध उपक्रम राबवण्यात आले. पाचगाव येथील युवक अंकुश दादाजी मडावी वय 21 याचा गडचांदूर राजुरा रोडवर अपघाती मृत्यू झाला. तो घरातला कमवता होता आणि त्यांची परिस्थिती हलाकीची आहे.
सदर घटनेच्या अनुषंगाने शिवसेना राजुऱ्याच्या वतीने सर्व पदाधिकाऱ्यांनी त्यांची भेट घेऊन सात्वन केले आणि कुटुंबाला एक मदतीचा हाथ म्हणून 11000 रुपयाची रोख मदत करण्यात आली. तसेच रामपूर येथील मातामंदिराच्या छतासाठी 12500 रुपयाचे टिन घेऊन देऊन मदत केकरण्यात आली. परिसरात दुर्दैवी घटना असो कि सामाजिक मदत असो ज्या गोष्टीला कुठलीही सरकारी मदत येत नसते अश्या ठिकाणी राजुरा शिवसेना फुल ना फुलाची पाकडी म्हणून मदत करत असते. हा एक चांगला विचार असून ज्या गोष्टीसाठी लोकप्रतिनिधी आपला पालक म्हणून धावत यायला पाहिजे त्याठिकाणी कोणताही लोकप्रतिनिधी तालुक्यात शिवसेनेचा नसताना सुद्धा अश्याप्रकारचे समाज कार्य नेहमी तालुका शिवसेनेच्या वतीने चालू असते.
याप्रसंगी शिवसेनेचे विधानसभा समन्वयक बबन उरकुडे, तालुका प्रमुख वासुदेव चापले,तालुका समन्वयक प्रदीप येनूरकर, युवासेना तालुका प्रमुख बंटी मालेकर ,शिवसेना उपतालुका प्रमुख रमेश झाडे, प्रवीण अस्वले, तालुका समन्वयक युवासेना साहिल देवगडे, गोवरीच्या सरपंच आशाताई उरकुडे, विभाग प्रमुख आदिवासी आघाडी सुरेखा तलांडे, विभाग प्रमुख अजय साकीनाला, गणेश चोथले, प्रवीण अस्वले, सिद्दू जनजर्लावार, नरेश कोपल्ला, अजय देशमुख, रोहित जागेटी, आदित्य भंडारी राधे भोगा रोहीत नलके, मनोज कुरवटकर, संदीप घ्यार, सुनील गौरकार, विजय भोयर,लक्ष्मण नुलावार, दशरथ भोयर, रामाजी नुलावार, प्रशांत भेंडे, रुपेश पुलगमवार, लटारू भिवनकर आणि गावातील नागरिक उपस्थित होते.
टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.