Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author
Title: चंद्रपूर शहरात ज्युबली हायस्कुल परिसरात युवकाची हत्या
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
चंद्रपूर शहरात ज्युबली हायस्कुल परिसरात युवकाची हत्या घातपात चंद्रपुरात खळबळ राजूरात  आमचा विदर्भ - ब्युरो रिपोर्ट्स चंद्रपूर - चंद्रपूर शहर...
चंद्रपूर शहरात ज्युबली हायस्कुल परिसरात युवकाची हत्या
घातपात चंद्रपुरात खळबळ राजूरात 
आमचा विदर्भ - ब्युरो रिपोर्ट्स
चंद्रपूर -
चंद्रपूर शहराच्या मध्यभागी व सतत वर्दळ असलेल्या ज्युबली हायस्कुल शाळेच्या आवारातील शासकीय इमारतीच्या छतावर एका युवकाचा मृतदेह आढळून आल्याने खळबळ माजली आहे. मिळालेल्या माहितीनुसार सदर युवकाच्या मृतदेहाजवळ दारूच्या बाटल्या आढळून आल्याने शंका कुशंकाना पेव सुटले असून मारेकऱ्यांनी सोबत दारू पिऊन त्या युवकाची हत्या केल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. विशेष म्हणजे मृत युवकाच्या डोक्यावर दारू पिऊन बॉटल फोडल्याच्या खुणा दिसून येत आहे तसेच मृतदेहाचे हात व पाय सेलो टेप ने चिपकविण्यात आले होते.
सदर हत्येतील मृतकाचे नाव राहुल विलास ठक वय अंदाजे 30 वर्ष रा. स्टेट बँक पेठ वार्ड राजुरा येथील रहिवासी असुन तो चंद्रपूर येथे एका डॉक्टरकडे वाहन चालकाचे काम करायचा. मृतक आपल्या आईसह किरायाने राहत होता. काल सायंकाळी 6 वाजताच्या सुमारास तो आपल्या घरून चंद्रपूर येथे गेला मात्र रात्री त्याच्या हत्येचीच माहिती घरच्यांना कळली. पोलिसांनी आरोपींविरुद्ध भादंवि १८६० कलम २०१, ३०२ अन्वये गुन्हा दाखल केला असून पुढील तपास चंद्रपुर शहर पोलीस करीत आहे. लवकरच या हत्येचा प्रकरणाचा उलगडा होईल असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top