Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author
Title: "त्या" खुनाच्या गुन्ह्यातील तिन मुख्य आरोपी स्थानिक गुन्हे शाखेच्या जाळयात
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
"त्या" खुनाच्या गुन्ह्यातील तिन मुख्य आरोपी स्थानिक गुन्हे शाखेच्या जाळयात चंद्रपूर शहरातील ज्युबली हायस्कुल परिसरात झाली होती युव...
"त्या" खुनाच्या गुन्ह्यातील तिन मुख्य आरोपी स्थानिक गुन्हे शाखेच्या जाळयात
चंद्रपूर शहरातील ज्युबली हायस्कुल परिसरात झाली होती युवकाची हत्या
डी.एस. ख्वाजा - आमचा विदर्भ प्रतिनिधी
चंद्रपुर -
पोलिसांना दि. 14 जुन 22 च्या रात्री 8:30 ते 09:00 वाजताच्या दरम्यान पोलीस नियंत्रण कक्ष येथे 112 वर कॉल वरून माहिती मिळाली कि ज्युबली शाळेच्या मागे पडक्या ईमारतीचे वर एक चिकटपट्टीने गुडलेले एका इसमाचे प्रेत पडून आहे. या माहितीवरून पोलीस नियंत्रण कक्ष, चंद्रपूर यांनी स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपूर, पोस्टे रामनगर, पोस्टे चंद्रपूर शहर यांना माहिती देण्यात आली. त्यानुसार संबंधीत पोस्टे व शाखेचे प्रमुख तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. ज्युबली शाळेचे मागे जिल्हा परिषद क्वार्टर जवळील शिक्षण भवनाच्या जुन्या पडक्या ईमारतीचे स्लॅबवर हातापायाला व मानेला चिकपट्टी गुंडलेले एक 25 ते 30 वयोगटातील इसमाचे प्रेत दिसून आले. पोलिसांनी मृतकाच्या पहिले असता सदर इसमाचा खुन झाल्याचे दिसून आले. त्यावरून घटनेचे गांभीर्य ओळखून पोलीस अधीक्षक चंद्रपूर यांनी तात्काळ ओळख पटवून त्याचे मारेकरी शोधण्याच्या सुचना स्थानिक गुन्हे व पोस्टे चंद्रपूर शहर यांना केल्या. 
सदर घटनेचे गांभीर्य ओळखून या बाबत पोलीस निरीक्षक खाडे स्थानिक गुन्हे शाखा चंद्रपूर यांनी त्यांचे अधिनस्त असलेले सहाय्यक पोलीस निरीक्षक जितेंद्र बोबडे व सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप कापडे यांचे दोन पथक तयार करून मयत ईसमाधी ओळख व आरोपी शोध संबधाने त्यांना सुचना देण्यात आल्या. सदर पथक मयत ईसमाची ओळख व त्यास मारणाऱ्या इसमाचा शोध घेत असता मयत ईसमा बाबत गोपनीय बातमी दारांकडून माहिती मिळाली की, यातील मयत ईसम नामे राहूल विलास ठक वय 30 वर्षे रा. हैद्राबाद बँके जवळ पेठ वार्ड राजूरा हा असल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर पोस्टे चंद्रपूर शहर येथे अप क्र. 327/2022 कलम 302, 201 भादवी अन्वये गुन्हा नोद करण्यात आला. 
सदर गुन्हयातील संशईत ईसमाचा शोध घेणे पोलिसांनी सुरु केले असता कोणताही ठोस व सबळ पुरावा आरोपींनी घटनास्थळावर सोडला नव्हता, आरोपींचे शोध संबंधाने सपोनि संदीप कापडे, स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपूर यांना मुखबीरव्दारे खबर मिळाली की, मयत हा डॉ. चिल्लरवार यांचे दवाखान्यात गाडी चालक म्हणून काम करीत होता. तेव्हा अंदाजे एका वर्षापुर्वी त्याचे एका महिलेबरोबर मोबाईलवर काहीतरी मेसेज केले होते त्यावरून त्यांचेत वाद झाला होता व त्या स्त्रीचे दोन मुलांनी मयत यास मारहाण केली होती. अशी गोपनिय माहिती मिळाली. यावरून स्थानिक गुन्हे शाखेचे पथक सदर महिलेचा शोध घेवून तिचे घरी जावून तिला व तिचे पतीला तिचे मुला बाबत विचारपूस केली असता लहान मुलगा घरी मिळून आला व मोठा मुलगा हा नाशिक येथील एमआयडीसी मध्ये कामाला असून पत्नीसह नाशिक येथे वास्तव्यास असल्याची माहिली मिळाली. त्यावरून मुलगा नामे वैभव राजेश डोंगरे हा सध्या नाशिकला आहे किंवा कसे या बाबत माहिती घेतली असता तो मागील तिन दिवसापासून नाशिक वरून चंद्रपूर ला आल्याची माहिती मिळाली. 
पोलिसांनी तपासाची सूत्रे हालवत चंद्रपूर येथील त्याचे जवळचे मित्र कोण या बाबत माहिती घेतली असता त्याचा मित्र संदीप उर्फ गुड्डू राजकुमार बर्लेवार वय 30 वर्षे रा. चंद्रपूर यास ताब्यात घेवून विचारपूस केली असता तो कोणतेही समाधान कारक उत्तरे देत नव्हता, नमुद इसमाशी विचारपूस सुरु असतानाच पोलिसांना गोपनिय सुत्रांकडून माहिती मिळाली की, वैभव डोंगरे हा त्याचे एका साथीदारासह नाशिकला जाणार आहे. या माहिती वरून त्याचा शोध घेवून त्यांना ताब्यात घेण्यात आले. वैभव डोंगरे व त्याचे सोबत असलेला त्याचा मित्र कार्तिक रमेश बावणे वय 25 वर्षे रा. सिंदेवाही यांना विचारपूस केली असता वैभव डोंगरे याने सांगीतले की, त्याचा मयत याचेशी मागील एक वर्षाआधी झालेल्या वादावरून त्याचे साथीदार संदीप उर्फ गुड्डू राजकुमार बर्लेवार वय 30 वर्षे चंद्रपूर व कार्तिक रमेश बावणे वय 25 वर्षे रा. सिंदेवाही यांचे मदतीने रात्रौ दरम्यान ज्युबली शाळे मागे जिल्हा परिषद क्वार्टर जवळील एका शासकीय जुन्या व पडक्या ईमारतीचे स्लॅपवर मयत राहूल विलास ठक वय 30 वर्षे रा हैद्राबाद बैंक जवळ पेठ वार्ड राजूरा यास नेऊन त्याला त्या ठिकाणी दारू पाजून त्याचा गळा आवळून व डोक्यावर दारूच्या काचेचे बॉटलने वार करून जिवानीशी ठार मारले व जवळ असलेल्या चिकटपट्टीने बांधून प्रेत त्याच ठिकाणी ठेवून निघून गेले. सदर गुन्हयात नमुद तिनही आरोपींना ताब्यात घेण्यात आले असून सदर गुन्हयाचा पुढील तपास पोस्टे चंद्रपूर शहर हे करीत आहे. सदरची कार्यवाही प्रभारी पोलीस अधीक्षक राहुल माकणीकर, प्रभारी अप्पर पोलीस अधीक्षक शेखर देशमुख  यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा चंद्रपुर चे सहाय्यक पोलीस निरीक्षक जितेंद्र बोबडे यांचे नेतृत्वात स्थानिक गुन्हे शाखे चे सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप कापडे, सफौ राजेंद्र खनके, पो. हवा. स्वामी चालेकर, संजय आतकुलवार, नितीन साळवे, सुरेंद्र मोहंती, ना.पो.कॉ. सुभाष गोहोकार, चंदू नागरे, संतोष येलपुलवार, गणेश मोहुर्ले पो.कॉ. सतिश बगमारे, कुंदन बावरी, रवि पधरे, गोपीनाथ नरोटे, प्राजल झिलपे यांनी केली. पुढील तपास सबंधीत पोस्टे करीत आहे. 

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top