Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: राजुरा गडचांदूर मार्गावर दर्ग्यासमोर झालेल्या अपघातात दोन तरुणी जागीच ठार
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
राजुरा गडचांदूर मार्गावर दर्ग्यासमोर झालेल्या अपघातात दोन तरुणी जागीच ठार परीक्षेसाठी राजुरा येथे येत असताना खामोना जवळ अपघात विरेंद्र पुणेक...
राजुरा गडचांदूर मार्गावर दर्ग्यासमोर झालेल्या अपघातात दोन तरुणी जागीच ठार
परीक्षेसाठी राजुरा येथे येत असताना खामोना जवळ अपघात
विरेंद्र पुणेकर - आमचा विदर्भ प्रतिनिधी
राजुरा -
चिंचोली येथील महाविद्यालय शिकत असलेल्या दोन विद्यार्थिनी परीक्षेसाठी राजुरा येथील शिवाजी महाविद्यालयात येत असताना खामोना जवळील दर्ग्यासमोर झालेल्या अपघातात जागीच ठार झाल्याची दुर्दैवी घटना दुपारी 1 वाजताच्या सुमारास घडली.
मिळालेल्या माहितीनुसार निंबाळा येथिल अंजली नंदलाल मेश्राम वय 20 वर्ष व तिची वर्ग मैत्रीण सगुणा भिवसन झाडे वय 20 वर्ष ह्या दोघीही निंबाळा येथुन विद्यापीठाची परीक्षा देण्याकरिता राजुरा येथील शिवाजी महाविद्यालयात येत असताना ट्रक ला ओव्हरटेक करण्याच्या नादात राजुऱ्या कडून कोरपना येथे आपल्या बहिणीच्या घरी जात असलेल्या चुनाळा येथील विशाल रामचंद्र चिंचोलकर वय 26 वर्ष ह्याच्या दुचाकीला धडकल्याने रस्त्यावर कोसळल्या.
दरम्यान मागुन येत असलेल्या ट्रक चे चाक एका युवतीच्या डोक्यावरून गेल्याने ती गतप्राण झाली तर रस्त्यावर आदळल्याने लागलेल्या मारामुळे दुसऱ्या युवतीनेही जागीच प्राण सोडले. विद्यापीठाची परीक्षा देण्यास निघालेल्या युवतींची काळाने अचानक परीक्षा घेतल्याने दोन्ही युवतींचा जागीच मृत्यू झाला. 
घटनेची माहिती मिळताच राजुरा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन परिस्थिती नियंत्रणात ठेवली व पंचनामा करून दोन्ही युवतीचे शव उत्तरीय तपासणीसाठी राजुरा उप जिल्हा रुग्णालयात पाठविले मात्र ज्या ट्रक खाली युवती आली त्या ट्रक बद्दल कुठलीही माहिती मिळू शकली नाही. राजुरा पोलिसांनी विशाल रामचंद्र चिंचोलकर ह्याला ताब्यात घेतले असून एपीआय साखरे ह्यांच्या नेतृत्वात घटनेचा तपास सुरू आहे.

About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top