Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author
Title: सौ. अमृताताई फडणवीस यांच्या विरोधात सोशल मीडिया वर आक्षेपार्ह पोष्ट करणाऱ्यावर कार्यवाही करून गुन्हा दाखल करा
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
सौ. अमृताताई फडणवीस यांच्या विरोधात सोशल मीडिया वर आक्षेपार्ह पोष्ट करणाऱ्यावर कार्यवाही करून गुन्हा दाखल करा भारतीय जनता पक्षाच्या महिला आघ...
सौ. अमृताताई फडणवीस यांच्या विरोधात सोशल मीडिया वर आक्षेपार्ह पोष्ट करणाऱ्यावर कार्यवाही करून गुन्हा दाखल करा
भारतीय जनता पक्षाच्या महिला आघाडी व भाजपा तालुका आघाडीच्या वतीने पोलीस स्टेशन गोंडपिपरी येथे माजी आमदार अँड. संजय धोटे यांच्या नेतृत्वात तक्रार दाखल
आमचा विदर्भ - ब्युरो रिपोर्ट्स
गोंडपिपरी -
दिनांक १३-०६-२०२२ रोजी दुपारी ३-०० वाजताचे दरम्यान सोशल मीडिया च्या माध्यमातून गोंडपिपरी येथील एका इसमाने गोंडपिपरी तालुक्यातील सोशल मीडिया वाटस्पअप ग्रुपमध्ये आक्षेपार्ह भाष्य करित अश्लील टिप्पणी केलेली आहे. या इसमाने गोंडपिपरी शहरातील विविध ग्रुपवर आक्षेपार्ह टिप्पणी करित विशिष्ट समाजावर आक्षेपार्ह प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. सदर पोष्टमुळे सामाजिक शांतता भंग होत असून समाजात तेढ निर्माण करण्याचे कार्य उपरोक्त व्यक्तीने केले आहे. स़दर पोस्ट महिलांना अपमानित करणारी असून अतिशय गंभीर बाब आहे. सदर पोष्ट मधिल आक्षेपार्ह टिप्पणी व अश्लील टिप्पणी मुळे सौ. अमृता फडणवीस यांची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न असून महिलाना सुध्दा अपमानास्पद वाटेल अशी कृती या इसमाने केली आहे. 
सदर केलेले कृत्य हे जाणिवपूर्वक केलेले असून त्याचा व्यवहार सामाजिक क्षेत्रात चांगला नसल्याचे यावरून स्पष्ट दिसून येतेय. सदर व्यक्ती ने अश्लील शब्दांत टिप्पणी करित महिलांच्या भावना दुखावल्या आहेत. तसेच या व्यवसायात ब्राम्हण महिला प्रोफेशनल होतील का? असे उदघार करित समाजातील महिलांचा अनादर केलेला आहे. सदर व्यक्ती ने गोंडपिपरी येथील विविध सोशल मीडिया ग्रुपवर पोष्ट प्रसारित करित महिलांच्या भावनाचा खेळ सुरू केला असून त्याचा विरूद्ध कार्यवाही होणे अपेक्षित आहे. अशी भावना भारतीय जनता पक्षाच्या महिला आघाडीच्या वतीने करण्यात आली आहे.  आक्षेपार्ह पोष्ट विरोधात राजुरा विधानसभा क्षेत्रातील माजी आमदार अँड. संजय धोटे यांनी तातडीने दखल घेत पोलीस निरीक्षक जिवन राजगुरू पोलीस स्टेशन गोडपिपरी याना तक्रार असून सदर तक्रारी संदर्भात त्वरित दखल घेऊन त्याचे विरोधात कार्यवाही करण्याचे आश्वासन पोलीस निरीक्षक गोंडपीपरी यांनी माजी आमदार संजय धोटे, भाजपा महिला मोर्चा प्रदेश उपाध्यक्षा सौ. वनिता कानडे व भारतीय जनता पक्षाच्या महिला आघाडी व भाजपा पदाधिकारी यांना दिले.
पोलीस स्टेशनला माजी आमदार अँड संजय धोटे व भाजपा तालुका अध्यक्ष बबन निकोडे तसेच महिला अध्यक्षा सौ.अरूणा जाभुळकर यांनी आपल्या सहिनिशी तक्रार दाखल केली आहे.या प्रसंगी गोडपिपरी तालुक्यातील पदाधिकारी व महिला आघाडी पदाधिकारी उपस्थित होते, यात भाजपचे जेष्ठ नेते सुहास माडुरवार, तालुका महमंत्री रवि पावडे, भाजपा शहर अध्यक्ष चेतनसिंग गौर, माजी नगराध्यक्ष संजय झाडे, पंचायत समिती उपसभापती मनिष वासमावार, शहर मंहामंत्री साईनाथ मास्टे, भाजयुमो अध्यक्ष प्रशांत येल्लेवार, गणेश डाहाळे,मनोज वनकर, नगरसेविका मनिषाताई दु्यौधन, नगरसेविका कुमारी मनिषाताई मडावी, नगरसेविका सौ. अश्विनीताई तोडासे, सौ.कोमल ताई फरकडे, सौ.रेणुकाताई येल्लेवार तसेच ईतर महिला पदाधिकारी उपस्थित होते.

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top