Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: रामपूर येथे नगरपरिषद निधी अंतर्गत रस्ता बांधकामाचे भूमिपूजन
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
रामपूर येथे नगरपरिषद निधी अंतर्गत रस्ता बांधकामाचे भूमिपूजन १३ लक्ष ८४ हजार रुपये निधीतून होणार रस्त्याचे डांबरीकरण आमचा विदर्भ - ब्युरो रिप...
रामपूर येथे नगरपरिषद निधी अंतर्गत रस्ता बांधकामाचे भूमिपूजन
१३ लक्ष ८४ हजार रुपये निधीतून होणार रस्त्याचे डांबरीकरण
आमचा विदर्भ - ब्युरो रिपोर्ट्स
राजुरा -
राजुरा तालुक्यातील मौजा रामपूर येथे वार्ड क्रमांक ३ येथे राजुरा - सास्ती रोड पासून राजुरा नगर परिषदेच्या फिल्टरप्लांट पर्यंतच्या रस्त्याचे डांबरीकरण नगर परिषद राजुराच्या निधी अंतर्गत करण्यात येत आहे. या विकासकामाचे भुमीपुजन पार पडले. रामपूर येथील स्थानिक रहिवासी, ग्राप सदस्य आणि काँग्रेसच्या पदाधिकारी यांच्या मागणीच्या अनुषंगाने नगराध्यक्ष अरुण धोटे यांच्या प्रयत्नाने सदर रस्त्याला मंजूरी मिळाली असून १३ लाख ८४ हजार रुपये निधी खेचून येथे डांबरीकरण करण्यात येत आहे. 
याप्रसंगी रामपूरच्या माजी सरपंच मंजुषा खंडाळे, ग्रापं सदस्य रमेश झाडे, जगदिश बुटले, संगीता विधाते, लता डकरे, उपसरपंच सुनिता उरकुडे, लक्ष्मीताई चौधरी, संगांनि योजनेचे सदस्य कोमल पुसाटे, सुधाकर उईके, देवराव कावळे, हारून शेख, कमलेश मनोहर, अक्षय डकरे, उज्वल, संतोष शेन्डे, राजुरा नगर परिषदेचे जे.ई. रवींद्र जामुनकर, भाग्यश्री कुरवटकर, गजानन कुबडे यासह ग्रामस्थ उपस्थित होते.

About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top