Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author
Title: सरपंचावर उपोषणाची वेळ येणे दुदैवी - रमेश राजूरकर
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
सरपंचावर उपोषणाची वेळ येणे दुदैवी - रमेश राजूरकर भद्रावतील ७५ गावातील पथदिव्यांचा वीज पूरवठा सुरु करण्याची मागणी डी.एस. ख्वाजा - आमचा विदर्भ...
  • सरपंचावर उपोषणाची वेळ येणे दुदैवी - रमेश राजूरकर
  • भद्रावतील ७५ गावातील पथदिव्यांचा वीज पूरवठा सुरु करण्याची मागणी
डी.एस. ख्वाजा - आमचा विदर्भ विशेष प्रतिनिधी
चंद्रपूर -
भद्रावती तालुक्यातील ७५ गावातील पथदिव्यांची वीज महावितरण कंपनीने कट केली असून परिणामी गावातील नागरिकांना रात्री अंधाराचा सामना करावा लागत आहे. पथदिव्यांचे थकीत बील भरण्यासाठी ग्रामपंचायत जवळ पैसा नाही. त्यामुळे शासनाने वीज पुरवठ्याचे बील भरण्यासाठी ग्रामपंचायतींना अनुदान द्यावे, पथदिव्यांचा वीज पुरवठा सुरळीत करावा या मागणीसाठी एक, दोन नव्हे तर ७५ ग्रामपंचायतीच्या सरपंच, उपसरपंचावर उपोषणाची वेळ येणे दुदैवी आहे. शासन, प्रशासनाने याकडे लक्ष देवून अनुदान देणे गरजेचे आहे. मात्र त्यांनी दुर्लक्ष केले आहे, या ग्रामपंचायतींचा वीज पुरवठा पूर्ववत केला नाही तीव्र आंदोलन करण्याचा इशारा सामाजिक कार्यकर्ते रमेश राजुरकर यांनी दिला.
भद्रावती तालुक्यातील तब्बल ७५ गावातील सरपंच, उपसरपंचांनी पथदिव्यांच्या वीज पुरवठ्यासाठी वरोरा येथे आंदोलन पुकारले असून या आंदोलनाला भेटीप्रसंगी त्यांना हा इशारा दिला. पावसाळा अगदी तोंडावर आला आहे. अशावेळी रस्त्यांवर श्वापदांची भिती असते. मात्र ऐन पावसाळ्याच्या तोंडावरच गावागावांतील वीज पुरवठा खंडित करण्यात आला असून त्यामुळे अनुचित घटना घडल्यास जबाबदार कोण? असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला आहे. यासंदर्भात राज्य शासनाला निवेदन पाठविणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

उपोषणाला पाठींबा
भद्रावती तालुक्यातील ७५ गावातील सरपंच, उसपरपंचानी पथदिव्यांचा वीज पुरवठा सुरळीत करण्यासाठी उपोषण सुरु केले आहे. या आंदोलनाला सामाजिक कार्यकर्ते रमेश राजूरकर यांनी पाठींबा दिला आहे.

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top