Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: गुणवंत विद्यार्थ्यांनी यशस्वी होऊन मानवी मुल्यांची जोपासना करावी - आमदार सुभाष धोटे
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
गुणवंत विद्यार्थ्यांनी यशस्वी होऊन मानवी मुल्यांची जोपासना करावी - आमदार सुभाष धोटे सेवा कलश फाऊंडेशनच्या वतीने गुणवंत विध्यार्थ्यांचा सत्का...
गुणवंत विद्यार्थ्यांनी यशस्वी होऊन मानवी मुल्यांची जोपासना करावी - आमदार सुभाष धोटे
सेवा कलश फाऊंडेशनच्या वतीने गुणवंत विध्यार्थ्यांचा सत्कार
आमचा विदर्भ - ब्युरो रिपोर्ट्स
राजुरा -
गुणवंत विद्यार्थ्यांनी जीवनाच्या प्रत्येक पायरीवर मोठय़ा परिश्रमाने आणि जिद्दीने यश प्राप्त करावे. आवडीच्या क्षेत्रात मोठ्या पदावर काम करावे मात्र यशस्वी होऊन गुणवंत विद्यार्थ्यांनी मानवी मुल्यांची जोपासना करावी. ज्यांनी आपल्यासाठी कष्ट घेतले अशा आपले आईवडील, शिक्षक आणि समाजाचे ऋण फेडावे असे आवाहन आमदार सुभाष धोटे यांनी छत्रपती शिवाजी महाराज संकुल राजुरा येथे सेवा कलश फाऊंडेशन राजुरा द्वारा आयोजित इयत्ता १० वी व १२वी च्या गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्कार सोहळ्याप्रसंगी केले. या प्रसंगी प्रा. डॉ. संजय गोरे यांनी विद्यार्थ्यांनी परिश्रमात सातत्य ठेवावे, यश प्राप्तीसाठी कोणताही शार्टकट नाही तेव्हा प्रामाणिक प्रयत्नाने यशवंत व्हावे असे मत व्यक्त केले. 
या प्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून नगराध्यक्ष अरूण धोटे, प्रमुख मार्गदर्शक प्रा. डॉ. संजय गोरे, सेवा कलश फाऊंडेशनचे अध्यक्ष अभिजित धोटे आदी मान्यवर उपस्थित होते. या प्रसंगी नामांकित शाळा महाविद्यालयातील इयत्ता १० वी व १२ वी च्या एकूण ३५ गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. 
कार्यक्रमाचे प्रास्ताविक अभिजीत धोटे यांनी केले. सुत्रसंचालन व आभार प्रदर्शन प्रा. प्रफुल्ल शेंडे यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अझर सिध्दीकी, प्रदीप नागोसे, विद्यानंद मोहुर्ले, जितेंद्र नवघरे, रवी कार्लेकर, विनोद घिवे यासह सेवा कलश फाऊंडेशन राजुरा च्या सर्व सदस्यांनी अथक परिश्रम घेतले.

About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top