Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: आनंदाच्या दिवस - शाळेचा पहिला दिवस
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
आनंदाच्या दिवस - शाळेचा पहिला दिवस ऑर्किट इंटर नॅशनल स्कुलचे आगळेवेगळे आयोजन पालकांनीही उत्स्पुर्तपणे सहभाग नोंदवून बालपणातील सुखद क्षणांचा ...
आनंदाच्या दिवस - शाळेचा पहिला दिवस
ऑर्किट इंटर नॅशनल स्कुलचे आगळेवेगळे आयोजन
पालकांनीही उत्स्पुर्तपणे सहभाग नोंदवून बालपणातील सुखद क्षणांचा घेतला अनुभव
आमचा विदर्भ - ब्युरो रिपोर्ट्स
राजुरा -
मुलांचे सामाजिक मुल्याशी नैतिकता कशी बाळगायची यांची पाया भरणी करणारे महत्वाचे स्त्रोत म्हणजे शाळा. ऑर्किट इंटर नॅशनल स्कुल राजुरा येथे प्राथमिक विभागाचा शाळेचा पहिला दिवस अगदी आगळ्या वेगळ्या पद्धतीने साजरा करण्यात आला. शाळेच्या पहिल्या दिवशी शाळेचे संचालक समीर चिल्लावार तसेच ऑर्किट इंटर नॅशनल स्कुलच्या मुख्याध्यापिका कु. सिमा आमटे, किडझीच्या मुख्याध्यापिका सौ. मोनाली गुंटीवार यांच्या हस्ते सरस्वती पुजन व दिप प्रज्वलनाने सुरुवात करण्यात आली. 
शैक्षणीक सत्र 2022-2023 मध्ये शाळेचा मुख्य उद्देश मुलांचा सर्वांगीण विकास हाच राहील असे समीर चिल्लावार यांनी आपल्या मार्गदर्शनात उल्लेखिले केले तसेच यावेळी पालकांच्या हस्ते संगणक कक्षाचे उद्घाटन समारोह करण्यात आले. शाळेचा पहिला दिवस आनंदाचा व विस्मरणीय तसेच पालकांचा व मुलांचा उल्हास वाढविण्यासाठी विविध स्पर्धाचे आयोजन करण्यात आले. यात पालकांनी उत्स्पुर्तपणे सहभाग नोंदवून बालपणातील सुखद क्षणांचा अनुभव घेतला. कार्यक्रमाचे संचालन सौ. वनिता रंगारी तर आभार नेहा शेख यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वितेकरिता शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले. 

About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top