Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author
Title: गडचांदूर नप वार्ड क्र 6 मध्ये निकृष्ठ दर्जाचे नाली बांधकाम
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
गडचांदूर नप वार्ड क्र 6 मध्ये निकृष्ठ दर्जाचे नाली बांधकाम स्लॅब टाकतांना सेंट्रिंग ऐवजी बांबू आणि सिमेंटच्या उरलेल्या पोत्यांच्या साहाय्यान...
गडचांदूर नप वार्ड क्र 6 मध्ये निकृष्ठ दर्जाचे नाली बांधकाम
स्लॅब टाकतांना सेंट्रिंग ऐवजी बांबू आणि सिमेंटच्या उरलेल्या पोत्यांच्या साहाय्याने स्लॅब बनविण्याचा नवीन प्रकार
नाली बांधल्यानंतर नालीच्या सांडपाण्याचीही व्यवस्था नाही
धनराजसिंह शेखावत - आमचा विदर्भ प्रतिनिधी
गडचांदूर -
वार्ड क्र. 6 साई मंदिर पासुन सावित्रीबाई फुले शाळेकडे जाणाऱ्या रस्त्याच्या बाजुला काही भागात नालीबांधकाम सुरू करण्यात आले होते. सदर बांधकाम सुरू होवुन बराचसा कालावधी लोटूनही अद्याप नालीचे बांधकाम पुर्ण झालेले नाही. यातही ठेकेदार कडुन थातुरमातूर पध्दतीने नालीबांधकाम सुरू आहे. किरायाच्या माणसांच्या आधारावर सदर बांधकाम ठेकेदाराकडुन सुरू असुन कोणतीही पर्यवेक्षणीय यंत्रणा नाही.
नालीबांधकाम सुरू असताना प्रत्येक टप्प्यावर किरायच्या माणसांकडून काम पाहण्यात आले. स्लॅब टाकताना सेंट्रिंगच्या ठिकाणी बांबु आणि सिमेंटच्या उरलेल्या पोत्यांच्या साहाय्याने स्लॅब बनविण्याचे नवीन आश्चर्यजनक प्रकार सदर ठेकेदाराच्या माणसांनी केले आहे. बांधकामात वापरल्या जाणाऱ्या मटेरियल चा दर्जा निकृष्ट असून इतर साहित्य निकृष्ठ/कनिष्ठ दर्जाचे तर आहेतच सोबत कामातही दिरंगाई केल्या जात आहे. नालीसाठी खोदलेल्या जमीनीची माती रस्त्यावरच टाकल्याने नागरीकांना त्यावरून चालयला त्रास तर होतच आहे, सोबतच काही छोटे अपघातही झाले आहेत.
पावसाळयात नाली बांधल्यानंतर नालीच्या सांडपाण्याचीही व्यवस्था करण्यात आलेली नाही. कमलीची बाब म्हणजे एवढी गंभीर बाब असुनही याबाबत नगरसेवक, अध्यक्षा आणि इतर सदस्यांना नागरीकांनी याबाबत कळविल्यानंतरही कोणतीही सुधारणा झालेली नाही. ठेकेदार किंवा कोणताही अधिकारी कामादरम्यान हजर राहत नाही. तेव्हा येथील प्रतिष्ठित नागरीक दशरथ डांगे, नथ्थुराम हुलके, विजय इंगोले, सत्तार शेख तसेच इतर नागरिकांनी याकडे प्रशासनाने लक्ष देण्याची मागणी केली आहे. कामात सुधारणा न झाल्यास संबंधिताच्या विरोधात वरीष्ठांकडे तक्रार करण्याचेही ठरविले आहे.

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top