Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: भालेराव कॉन्व्हेंट ने केला गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
भालेराव कॉन्व्हेंट ने केला गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव एच.एन. (राजेश) अरोरा प्रतिनिधी बल्लारपूर - भालेराव कोन्व्हेंट मधून १०वी च्या परीक्षेत...
भालेराव कॉन्व्हेंट ने केला गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव
एच.एन. (राजेश) अरोरा प्रतिनिधी
बल्लारपूर -
भालेराव कोन्व्हेंट मधून १०वी च्या परीक्षेत नेत्रदीपक यश संपादन करून शाळेचे नाव गौरवन्वीत करणाऱ्या विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला. याच शाळेतून १०वी च्या परीक्षेत ९३.८० टक्के मार्क घेऊन शाळेतून प्रथम येण्याचा मान पटकावणाऱ्या फिनिक्स नरेंद्र सोनारकर, ९२.२० टक्के मार्क घेऊन द्वितीय येणाऱ्या संयुक्ता अमोल रणदिवे,९० टक्के मार्क घेऊन तृतीय क्रमांक पटकवणाऱ्या आरती झा या विद्यार्थ्यांचा त्यांचा पालकासह गौरव करण्यात आला.त्याचबरोबर नेत्रदीपक यश संपादन करणाऱ्या विद्यार्थ्यांचाही शाळेमार्फत गौरव करण्यात आला.
यावेळी शाळेच्या हॉल मध्ये विद्यार्थ्यांची भरगच्च उपस्थिती होती.शाळेच्या संचालिका आशा गायकवाड,सहसचिव वैभव गायकवाड यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झालेल्या या समारंभात डायरेकटर रेव्ह रोकडे,प्राचार्य सीमा भास्करवार यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.कार्यक्रमाचे संचालन सोनू मेंडीस यांनी केले.शाळेतील विद्यार्थ्यांनी "यहाँ के हम है सिकन्दर" है गीत सादर करुन विद्यार्थ्यांना प्रेरित केले.

About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top