Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author
Title: आईसह दोन मुलींचा मृत्यू ; वरवट येथील घटना
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
आईसह दोन मुलींचा मृत्यू ; वरवट येथील घटना तर उसेगाव शेतशिवारात विज पडून महिलेचा मृत्यू डी.एस. ख्वाजा - आमचा विदर्भ प्रतिनिधी चंद्रपूर - आज व...
आईसह दोन मुलींचा मृत्यू ; वरवट येथील घटना
तर उसेगाव शेतशिवारात विज पडून महिलेचा मृत्यू
डी.एस. ख्वाजा - आमचा विदर्भ प्रतिनिधी
चंद्रपूर -
आज वीज पडून चंद्रपूर तालुक्यातील वरवट येथे दुपारी एक वाजताच्या सुमारास अंगणात असलेल्या आईसह दोन मुलींचा अकस्मात मृत्यू झाला. त्यांचा आंगावर पडली असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. तर दुसऱ्या घटनेत चिमूर तालुक्यातील उसेगाव शेतशिवारात वीज पडून एक महिला जागीच ठार झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
दुर्गापूर पोलीस स्टेशन हद्दीतील वरवट येथे रामटेके कुटुंबातील संगीता रामटेके वय ४० वर्षे, रागिणी वय १६ वर्षे व प्राजक्ता वय १४ वर्षे हे घरासमोरील अंगणात बसून असताना अचानकपणे वीज कोसळली यामध्ये तिघांचा जागीच मृत्यू झाला. मात्र याबाबत अजूनही दुजारो मिळालेला नाही नेमका मृत्यू वीज पडल्याने वा विजेचा धक्क्याने त्यांचा मृत्यू झाला याबाबत संभ्रम न निर्माण झाला आहे. 
कुटुंब प्रमुख गौतम रामटेके ऑटो चालवितो, नेहमीप्रमाणे ऑटो घेऊन तो बाहेर गेला होता. मात्र दुपारच्या सुमारास हि धक्कादायक घटना घडली. आज दुपारच्या सुमारास ढगाळ वातावरणाने विजेचा कडकडाट झाला होता. याबाबत दुर्गापूर पोलीस स्टेशनला माहिती देण्यात आली. ठाणेदार स्वप्नील धुळे हे तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. घटनास्थळाचा पंचनामा केला असता त्यांचा मृत्यू वीज पडून झाल्याची शक्यता वर्तवण्यात येत असली तरी पोस्टमार्टम अहवालानंतर या तिघांचा मृत्यूचे नेमके कारण काय हे स्पष्ट होईल. समोरील तपास दुर्गापूर पोलीस करीत आहे. या दुर्दैवी घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. प्राजक्ता व रागिणी या दोघी मातोश्री विद्यालयाच्या विद्यार्थिनी आहेत. 


उसेगाव शेतशिवारात विज पडून महिलेचा मृत्यू
चिमुर तालुक्यातील नेरी जवळच्या ऊसेगाव येथील शेतात वीज पडून एक महिला जागीच ठार झाल्याची घटना दुपारी 4 वाजताच्या सुमारास घडली. शशीकला तीरदास चा॓भारे वय 38 वर्षे रा. ऊसेगाव असे मृत महिलेचे नाव आहे.
मृतक महिला शेतीचा हंगाम सुरु असल्यामुळे ती सकाळी स्वतःच्या शेतात कामावर गेली होती. दुपारी 3 ते 4 वाजताच्या सुमारास चिमुर तालुक्यात विजेच्या मेघगर्जनेसह पावसाने दमदार हजेरी लावली. मेघगर्जनाने परीसरातील शेतकरी भयभीत होऊन घराकडे जाण्यास निघाले होते. मिळालेल्या माहितीनुसार शशीकला सुद्धा घराकडे जाण्यास निघाली असता रस्त्यात तीच्याअंगावर विज पडली. याची माहिती गावातील नागरिकांना मिळताच नागरिकांनी घटनास्थळी धाव घेऊन तात्काळ शशीकला चा॓भारे या महिलेला प्राथमिक आरोग्य केंद्र नेरी येथे उपचारासाठी नेले असता डाॅक्टरा॓नी तिला मृत घोषीत केले. शव विच्छेदनाकरिता तिचे पार्थिव उपजिल्हा रूग्णालय चिमूर येथे हलविण्यात आले असून पुढील तपास चिमूर पोलीस करीत आहे. मृतक शशीकला यांच्या पश्चात पती, मुलगा व मुलगी असा परिवार आहे.

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top