Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: आंतरराष्ट्रीय योग दिवस ; सामुहिक योग संपन्न
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
आंतरराष्ट्रीय योग दिवस ; सामुहिक योग संपन्न धनराजसिंह शेखावत - आमचा विदर्भ प्रतिनिधी कोरपना - आंतरराष्ट्रीय योग दिवस निमित्त सामुहिक योग महो...
आंतरराष्ट्रीय योग दिवस ; सामुहिक योग संपन्न
धनराजसिंह शेखावत - आमचा विदर्भ प्रतिनिधी
कोरपना -
आंतरराष्ट्रीय योग दिवस निमित्त सामुहिक योग महोत्सवाचे आयोजन श्रीकृष्ण सभागृह कोरपना येथे आयोजित करण्यात आले या कार्यक्रमाचे मुख्य मार्गदर्शक योग गुरू बंडु मोहितकर सर होते. प्रमुख उपस्थिती नारायण हिवरकर भाजपा तालुका अध्यक्ष कोरपना तथा जिल्हा उपाध्यक्ष, किशोर बावणे नगरसेवक कोरपना, ठावरी, नंदकिशोर गज्जलवार, रमेश पा. मालेकर, शशीकांत आडकीने, अमोल आसेकर, नारायण कोल्हे, सौ अल्काताई रणदिवे, सौ इंदिराताई कोल्हे, मती जयाताई धारणकर आदी मान्यवर उपस्थित होते. बंडु मोहितकर सर यांनी योगा प्राणायामचा वर्ग एक ते दिड तास घेतला व सर्वांना योग करा व निरोगी राहा असे सविस्तर मार्गदर्शन केले नारायण हिवरकर भाजपा तालुका अध्यक्ष यांनी बंडु मोहितकर यांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला व मा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली आंतरराष्ट्रीय योग दिवस म्हणून साजरा केला जातो या बद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे अभिनंदन केले कार्यक्रमाला उपस्थित सर्व भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच नागरिकांचे आभार मानले तसेच इतर मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले कार्यक्रमाला भाजप पदाधिकारी कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे संचालन किशोर बावणे यांनी केले तर आभार शशिकांत अडकिने यांनी मानले. 

About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top