Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: बाबुपेठ जवळ वाहनाच्या झडतीत सुगंधीत तंबाकू जप्त
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
बाबुपेठ जवळ वाहनाच्या झडतीत सुगंधीत तंबाकू जप्त चंद्रपूर पोलिसांची मोठी कारवाई डी.एस. ख्वाजा - आमचा विदर्भ प्रतिनिधी चंद्रपूर - दिनांक 20 जू...
बाबुपेठ जवळ वाहनाच्या झडतीत सुगंधीत तंबाकू जप्त
चंद्रपूर पोलिसांची मोठी कारवाई
डी.एस. ख्वाजा - आमचा विदर्भ प्रतिनिधी
चंद्रपूर -
दिनांक 20 जून 2022 ला दुपारी सपोनि जयप्रकाश निर्मल हे पोलीस स्टेशन ला हजर असतांना त्यांना सूत्रांकडून माहिती मिळाली कि, एका टाटा एस वाहनात महाराष्ट्रात प्रतिबंधीत सुगंधीत तंबाखु वाहुन नेत आहे. या माहितीवरून पोलीस निरीक्षक सुधाकर अंभोरे यांना माहिती देऊन त्यांचे मार्गदर्शनात बाबुपेठ पोलीस चौकी समोर पंच व अन्न सुरक्षा अधिकारी चंद्रपुर यांचे सह नाकाबंदी करून पोलिसांनी झडती केली असता वाहनाचे चालक नामे आरीफ मेहताब खान वय 38 वर्षे व सहकारी नामे शेख शाकीर शेख रेहमान वय 32 वर्षे दोन्ही रा. बगड खिडकी चंद्रपुर हे मिळुन आले. त्यांच्या वाहनांची सूत्रांकडून मिळालेल्या माहितीप्रमाणे पोलिसांनी पंचासमक्ष झडती घेतली असता त्यात प्रतिबंधीत 552800 रुपये किंमतीचा सुगंधीत तंबाखु अवैधपणे वाहतुक करतांना मिळुन आला व टाटा एस वाहन क्रं. एमएच 27 बीएस 2838 किंमत 3 लाख असा एकूण ८ लाख 52 हजार 800 रुपयाचा मुद्देमाल पोलिस व माल अन्न सुरक्षा अधीकारी गिरीष सातकर चंद्रपुर यांनी घटनास्थळी पंचनामा कार्यवाही करून जप्त केला व त्यांनी दिलेल्या फिर्याद वरून पोस्टे ला अपराध क.341/22 कलम 188,213,328 मा दवि सह कलम 30(2)(a);26(2)(1),26(2)(iv)59 अन्न सुरक्षा आणी मानके अधिनियम 2006 अन्वये गुन्हा नोंद करून तपासात घेतला.
सदर ची कार्यवाही पोलीस अधीक्षक चंद्रपूर, उपविभागीय पोलीस अधीकारी चंद्रपुर तथा पोलीस निरीक्षक चंद्रपूर चे मार्गदर्शनात जयप्रकाश निर्मल यांनी केली आहे. सदर कार्यवाही मध्ये गुन्हे शोध पथकातील पो हवा. शरीफ शेख, महेंद्र बेसरकर, विलास निकोडे, नापोशि जयंत चुनारकर, चेतन गज्जलवार, सचिन बोरकर, पोशि ईम्रान खान, रूपेश रणदिवे यांचा समावेश आहे.

About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top