Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: विजेच्या स्पर्शाने युवकाचा मृत्यू
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
विजेच्या स्पर्शाने युवकाचा मृत्यू एच.एन. (राजेश) अरोरा - आमचा विदर्भ प्रतिनिधी बल्लारपूर / कोठारी - जिवंत विद्युत तारांचा स्पर्श झाल्याने रा...
विजेच्या स्पर्शाने युवकाचा मृत्यू
एच.एन. (राजेश) अरोरा - आमचा विदर्भ प्रतिनिधी
बल्लारपूर / कोठारी -
जिवंत विद्युत तारांचा स्पर्श झाल्याने राहुल सुधाकर खामनकर वय १८ वर्षे रा. तोहोगाव या युवकाचा उपचारा दरम्यान मृत्यू झाल्याची घटना सोमवारला दुपारी घडली. मृतक राहुल याने नुकतीच बारावीची परीक्षा उत्तीर्ण केली मात्र त्याच्या मृत्यूमुळे तोहोगावात शोककळा पसरली असून सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
सुधाकर खामनकर हा अल्पभूधारक शेतकरी असून त्याचा एकुलता एक मुलगा राहुल याने नुकतीच माध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण केली होती. पुढील शिक्षणाकरिता पैसे गोळा करण्याच्या उद्देशाने मजुरी करण्याकरिता तोहोगाव येथील नितेश इटनकर यांच्या घरी गेला. घराच्या दुसऱ्या मजल्यावर घराचे प्लास्टर चे काम सुरू होते. घरातील वीज प्रवाह बंद करण्यास राहुल गेला असता जिवंत वीज प्रवाहित तारांना अचानक स्पर्श झाल्याने गंभीर जखमी झाला. त्याला ताबडतोब तोहोगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारार्थ दाखल करण्यात आले. मात्र प्रकृती गंभीर असल्याने जिल्हा रुग्णालयात चंद्रपूर येथे हलविण्यात आले पण उपचार करण्यापूर्वीच डॉक्टरांनी मृत घोषित केले. अठरा वर्षीय राहुल च्या निधनामुळे गावात हळहळ व्यक्त करण्यात येत असून गावात सर्वत्र शोकुकळा पसरली आहे. 

About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top