Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: बल्लारशहा रेल्वे प्लॅट फॉर्मवर अज्ञात ईसमाचा मृतदेह आढळला
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
बल्लारशहा रेल्वे प्लॅट फॉर्मवर अज्ञात ईसमाचा मृतदेह आढळला रेल्वे पोलिसांचे ओळख पटविन्याचे आवाहन एच.एन. (राजेश) अरोरा - आमचा विदर्भ प्रतिनिधी...
बल्लारशहा रेल्वे प्लॅट फॉर्मवर अज्ञात ईसमाचा मृतदेह आढळला
रेल्वे पोलिसांचे ओळख पटविन्याचे आवाहन
एच.एन. (राजेश) अरोरा - आमचा विदर्भ प्रतिनिधी
बल्लारपूर -
बल्लारपूर रेल्वे प्लॅटफॉर्म क्रमांक १ वर एक अनोळखी व्यक्ती जखमी अवस्थेत पडून असल्याची माहिती जीआरपीएफच्या रेल्वे पोलीसांना मिळाली असता त्या जखमी व्यक्तीला ताबडतोब उपचाराकरिता दवाखान्यात दाखल केले मात्र उपचारापूर्वीच डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.
मृतकाचे वर्णन उंची 5"5, वय अंदाजे 30-35, रंग-नीम गोरा, चेहरा-लांब व मोठा, बांधा-मजबूत, केस-काळे मध्यम, उजव्या हाताचा दंडावर विंचू चे चित्र, डाव्या हाताच्या दंडावर कासव वर साप गुंडाळलेले चित्र असे गोदवून असून अंगात कथ्या रंगाचा जीन्स पॅन्ट, कथ्या रंगाची हाफ टी शर्ट असे वर्णन असलेला मृतक व्यक्ती असून त्याची ओळख पटविन्याचे काम रेल्वे पोलीस करीत आहे. तसेच अशा वर्णनाच्या व्यक्तीला कोणी ओळखत असेल तर त्यांनी जीआरपीएफ रेल्वे पोलीस स्टेशन वर्धा, बल्लारशहा भ्रमणध्वनी क्रमांक 7499967957 व 9023371979 वर संपर्क साधावा असे आवाहन रेल्वे पोलिसांनी केले आहे.

About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top