Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author
Title: पोंभुर्ण्यात विज पडून शेतकरी ठार
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
पोंभुर्ण्यात विज पडून शेतकरी ठार एच.एन. (राजेश) अरोरा - आमचा विदर्भ प्रतिनिधी बल्लारपूर - शेतीची मशागत करण्यासाठी गेलेल्या एका शेतकऱ्यावर वि...
पोंभुर्ण्यात विज पडून शेतकरी ठार
एच.एन. (राजेश) अरोरा - आमचा विदर्भ प्रतिनिधी
बल्लारपूर -
शेतीची मशागत करण्यासाठी गेलेल्या एका शेतकऱ्यावर विज पडून तो ठार झाल्याची घटना सातारा तुकुम येथे रविवारी सकाळी ११ वाजताच्या सुमारास घडली.
मधुकर देवाजी परचाके वय ४३ वर्षे वर्ष असे मृतक शेतकऱ्याचे नाव असून तो पोंभुर्णा तालुक्यातील सातारा तुकुम येथील रहिवासी आहे. सकाळी आपल्या शेतातील काम करुन घराकडे परत येत असताना रस्त्यात त्यांच्या अंगावर विज पडली यात तो जागीच गतप्राण झाला. मृत शेतकऱ्याच्या पश्चात पत्नी व तिन मुली असुन घरचा कमावता व्यक्ती गेल्याने कुटुंबावर मोठे संकट कोसळले आहे.

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top