Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: भद्रावतीत कुजलेल्या अवस्थेत अज्ञात इसमाचा मृतदेह आढळला
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
भद्रावतीत कुजलेल्या अवस्थेत अज्ञात इसमाचा मृतदेह आढळला आमचा विदर्भ - ब्युरो रिपोर्ट्स भद्रावती - भद्रावती येथे आज सकाळी नव्याने बांधलेल्या न...
भद्रावतीत कुजलेल्या अवस्थेत अज्ञात इसमाचा मृतदेह आढळला
आमचा विदर्भ - ब्युरो रिपोर्ट्स
भद्रावती -
भद्रावती येथे आज सकाळी नव्याने बांधलेल्या नगरपरिषद व्यापारी संकुलात एका अज्ञात युवकाचे प्रेत आढळल्याने खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहिती नुसार आज अंदाजे वय 35 ते 40 एका युवकाचे प्रेत नव्याने बांधलेल्या व्यापारी संकुलात प्रेत सडलेल्या अवस्थेत आढळून आल्याने शहरात एकच खळबळ उडाली. याची माहिती भद्रावती पोलीस स्टेशनला देण्यात आली. प्रेत आढळल्याची वार्ता गावात वाऱ्यासारखी पसरताच नागरीकांनी व्यापारी संकुलात एकच गर्दी केली. मृतदेह हा तीन-चार दिवसांपूर्वी असलेल्या अवस्थेत असल्याची चर्चा आहे. सदर युवकाची हत्या की आत्महत्या आहे याबाबत सध्या पोलीस तपास करीत आहे. पुढील तपास ठाणेदार गोपाल भारती यांचे मार्गदर्शनात पोलीस प्रकाश देवकर व निकेश ढेंगे करीत आहे. 

About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top