Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author
Title: अस्थि विसर्जनासाठी गेलेल्या इसमाचा वर्धा नदीत बुडून मृत्यू
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
अस्थि विसर्जनासाठी गेलेल्या इसमाचा वर्धा नदीत बुडून मृत्यू आमचा विदर्भ - ब्युरो रिपोर्ट्स भद्रावती - भद्रावती येथील चंडिका वॉर्डातील प्रकाश ...
अस्थि विसर्जनासाठी गेलेल्या इसमाचा वर्धा नदीत बुडून मृत्यू
आमचा विदर्भ - ब्युरो रिपोर्ट्स
भद्रावती -
भद्रावती येथील चंडिका वॉर्डातील प्रकाश टिपले यांचे निधन झाले. त्यांच्या निधनानंतर त्यांच्या अस्थी विसर्जनासाठी वर्धा नदीच्या पिंपरी घाटावर कुटुंबासह दिलीप रणदिवे गेले होते व आंघोळ करीत असताना पाण्याचा अंदाज न आल्याने खोल पाण्यात बुडून त्यांचा मृत्यू झाला. दिलीप मारोती रणदिवे वय 50 वर्षे रा. चंडिका वार्ड भद्रावती असे नदीत बुडून मृत्यू झालेल्या इसमाचे नाव आहे.
ही घटना शनिवारला घडली या घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पाण्यातून प्रेत बाहेर काढले व पंचनामा करून मर्ग दाखल केला. पुढील तपास पोलीस करीत आहे.

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top