Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: ट्रक व स्कार्पिओची धडक
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
ट्रक व स्कार्पिओची धडक आमचा विदर्भ - ब्युरो रिपोर्ट्स सिंदेवाही - असलेल्या नागपूर महामार्गावरील मेंढा माल गावा जवळ स्कार्पिओ व ट्रॅक्टर ची ध...
ट्रक व स्कार्पिओची धडक
आमचा विदर्भ - ब्युरो रिपोर्ट्स
सिंदेवाही -
असलेल्या नागपूर महामार्गावरील मेंढा माल गावा जवळ स्कार्पिओ व ट्रॅक्टर ची धडक झाल्याने काही जण किरकोळ जखमी झाले आहेत.
ब्रह्मपुरी येथून रुग्णांना सिंदेवाही येथे आणत असताना स्कार्पिओ क्रमांक एमएच 34 के 3000 या वाहनाची ट्रॅक्टर क्रमांक एमएच 34 बीआर 4308 या वाहनाला धडक दिली. दोन वाहनाच्या समोरासमोर धडक झाल्याने महामार्गाचे रस्त्यावरील कामाचे गट्टू असलेल्या ढिगाऱ्याला जाऊन महिंद्रा स्कॉर्पिओ अडकली. यात ट्रॅक्टर चालक गंभीर जखमी झाला असून इतर किरकोळ जखमी झाले आहेत. अपघाताची माहिती सिंदेवाही पोलीस स्टेशन ला देण्यात आली असून पोलिसांनी घटनास्थळी जाऊन धडक झालेले वाहन जेसीबीच्या सहाय्याने पोलीस स्टेशन येथे जमा केले. पुढील तपास पोलिस करीत आहे.

About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top