Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: लॉयड्स मेटल्स कंपनीचा ट्रान्सफार्मर जळून खाक
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
लॉयड्स मेटल्स कंपनीचा ट्रान्सफार्मर जळून खाक आमचा विदर्भ - ब्युरो रिपोर्ट्स घुग्घुस - शहराला लागून लॉयड्स मेटल्स कंपनी असून या कंपनीच्या आतम...
लॉयड्स मेटल्स कंपनीचा ट्रान्सफार्मर जळून खाक
आमचा विदर्भ - ब्युरो रिपोर्ट्स
घुग्घुस -
शहराला लागून लॉयड्स मेटल्स कंपनी असून या कंपनीच्या आतमध्ये 230 केव्हीचा ट्रान्सफार्मर आहे.या ट्रान्सफॉर्मवरून मुंबई येथे विज देण्यात येते आज सायंकाळी 6.45 वाजताच्या दरम्यान या ट्रान्सफार्मला अचानक आग लागून ट्रान्सफार्म जळून खाक झाला मात्र जिवीत हानी झाली नसून यात वित्त हानीत कंपनीचे करोडो रुपयाचे नुकसान झाल्याचे सांगितले जाते.
आग इतकी भिषण होती की आगीचे लोळ व काळे धुराचे लोट लांब अंतरावरून दिसत होते.आग लागण्यापूर्वी या ठिकाणी मोठा आवाज आला होता यामुळे येथील नागरिकांनी कंपनीच्या सुरक्षा गेट जवळ गर्दी केली होती. आगीने रौद्र रूप धारण केल्यानंतर मोठया प्रमाणात आगीचे लोळ व धुराचे लोट आकाशात लोटले.नगर परिषेदेची अग्निशमन गाडी तात्काळ घटनास्थळी दाखल झाली होती परंतु आग आटोक्यात न आल्याने एसीसी सिमेंट कंपनीची अग्निशमन गाडी बोलाविण्यात आली.यावेळी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. यामुळे पोलीस घटनास्थळी दाखल होऊन गर्दीला पांगविण्यात आले होते.

About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top