Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author
Title: मृतकांच्या कुटुंबियांच्या खंबीरपणे पाठीशी : सुधीर मुनगंटीवार
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
मृतकांच्या कुटुंबियांच्या खंबीरपणे पाठीशी : सुधीर मुनगंटीवार एच.एन. (राजेश) अरोरा - आमचा विदर्भ प्रतिनिधी बल्लारपूर - चंद्रपूर-मुल महामार्गा...
मृतकांच्या कुटुंबियांच्या खंबीरपणे पाठीशी : सुधीर मुनगंटीवार
एच.एन. (राजेश) अरोरा - आमचा विदर्भ प्रतिनिधी
बल्लारपूर -
चंद्रपूर-मुल महामार्गावर अजयपूर येथे झालेल्‍या डिझेल टॅंकर व लाकडाने भरलेला ट्रक यांच्‍यात झालेल्‍या भिषण अपघातात मृत्‍युमुखी पडलेल्‍या 6 जणांच्‍या कुटूंबियांना आ. सुधीर मुनगंटीवार माजी वित्त व वन मंत्री, लोकलेखा समिती अध्यक्ष यांच्‍या हस्ते मुख्‍यमंत्री निधीतुन मृतकांच्‍या कुटूंबियांना प्रत्‍येकी ५ लाख रूपये चे अर्थसहाय्य दि. 18 जून रोजी धनादेशाचे स्वरुपात देण्यात आले. 
बल्लारपुर तालुक्यातील लावारी येथे आ. सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रमुख उपस्थीतीत मृतकांच्या कुटुंबियांना धनादेशाचे वितरण करण्यात आले. याप्रसंगी आ. सुधीर मुनगंटीवार यांनी आपल्‍या अर्थमंत्री पदाच्‍या काळात विधवा, निराधार महिलांच्‍या मानधनात ६०० रूपयांवरून १२०० रूपये वाढ केली याची आठवण करून दिली. तसेच मृत्यू मुखी पडलेल्या सर्व मृताच्या विधवा, निराधार महिलांना राष्ट्रीय कुटुंब अर्थसहाय्य योजनेचे २० हजार रूपये  मंजुरीचे आदेश सुध्‍दा याप्रसंगी आ. मुनगंटीवार यांच्‍या हस्‍ते प्रदान करण्‍यात आले. याप्रसंगी बोलताना आ. मुनगंटीवार म्‍हणाले की, या दुर्दैवी घटनेत कुटुंबानी आपला आधार गमावला आहे. हे नुकसान मोठे आहे. केवळ अश्रु पुसून ते भरून निघणार नाही. या कुटुंबांच्या पाठीशी आम्ही खंबीरपणे उभे आहोत अशी ग्वाही आ. सुधीर मुनगंटीवार यांनी दिली.
यावेळी वन विकास महामंडळाचे अध्यक्ष चंदनसिंह चंदेल, माजी नगराध्‍यक्ष हरीश शर्मा, लखनसिंह चंदेल, किशोर पंदिलवार, माजी जि.प. सदस्‍या सौ. वैशाली बुध्‍दलवार, बल्‍लारपूरचे तहसिलदार संजय राईंचवार, ठाणेदार उमेश पाटील, लावारीचे सरपंच योगेश पोतराजे, काशी सिंह यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top