Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: महात्मा गांधी विद्यालयात जागतिक योग दिवस साजरा
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
महात्मा गांधी विद्यालयात जागतिक योग दिवस साजरा धनराजसिंह शेखावत - आमचा विदर्भ प्रतिनिधी गडचांदूर - महात्मा गांधी विद्यालय, उच्च माध्यमिक विद...
महात्मा गांधी विद्यालयात जागतिक योग दिवस साजरा
धनराजसिंह शेखावत - आमचा विदर्भ प्रतिनिधी
गडचांदूर -
महात्मा गांधी विद्यालय, उच्च माध्यमिक विद्यालय गडचांदूर येथे जागतिक योग दिवस साजरा करण्यात आला. याप्रसंगी आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी प्राचार्या स्मिताताई चिताडे होत्या. योग प्रशिक्षक शारीरिक शिक्षक बबन भोयर यांनी मानवी जीवनात योगाचे महत्त्व पटवून दिले व प्रात्यक्षिक करून दाखवले,उपस्थित सर्व शिक्षकानी योगासने केली.
याप्रसंगी उपप्राचार्य विजय आकनूरवार, उपमुख्याध्यापक अनिल काकडे, पर्यवेक्षक एच बी मस्की, एम सी व्ही सी विभागाचे प्रमुख प्रा. अशोक डोईफोडे, शारीरिक शिक्षक प्रा प्रशांत पवार, संजय झाडे, अमोल शेळके तथा इतर  शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते. 

About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top