Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author
Title: आदर्श हायस्कुल ने राखली उत्कृष्ट निकालाची परंपरा
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
आदर्श हायस्कुल ने राखली उत्कृष्ट निकालाची परंपरा भाग्यश्री लोंढे 94.20%, आयुष जाधव 91.40%, चैताली निमकर 90.80%, तन्मय चनमेनवार 88.20%, साक्ष...
आदर्श हायस्कुल ने राखली उत्कृष्ट निकालाची परंपरा
भाग्यश्री लोंढे 94.20%, आयुष जाधव 91.40%, चैताली निमकर 90.80%, तन्मय चनमेनवार 88.20%, साक्षी पेंदोर 86.80
आमचा विदर्भ - ब्युरो रिपोर्ट्स
राजुरा -
बालविद्या शिक्षण प्रसारक मंडळ राजुरा द्वारा संचालित आदर्श हायस्कूल ने आपल्या उत्कृष्ट निकालाची परंपरा कायम राखली आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचा मार्च -एप्रिल 2022 मधे आयोजित करण्यात आलेल्या इयत्ता दहावीचा निकाल जाहिर झाला असून आदर्श हायस्कुल येथील भाग्यश्री लोढे हिने 94.20 टक्के प्राप्त करीत शाळेतून पहिली येण्याचा मान मिळवला तर द्वितीय क्रमांकावर आयुष जाधव 91.40 टक्के, तृतीय क्रमांक चैताली निमकर 90.80 टक्के, तन्मय चनमेनवार ने 88.20, साक्षी किसन पेंदोर 86.80 टक्के प्राप्त केले.
आदर्श शाळेतील गुणवत्ता यादीत 33 विद्यार्थी, प्रथम श्रेणीत 45 विद्यार्थी, द्वितीय श्रेणीत 18 विद्यार्थी, तृतीय श्रेणीत 3 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. शाळेचा निकाल 99 टक्के लागला आहे.
सर्व गुणवत्ताप्राप्त, उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष सतीश धोटे, उपाध्यक्ष मनोहर साबनानी, सचिव भास्कर येसेकर, सहसचिव शंकर काकडे, कोषाध्यक्ष प्रकाश बेजंकिवार, संचालक लक्ष्मणराव खडसे, मधुकर जाणवे, अविनाश निवलकर, मंगला माकोडे, आदर्श हायस्कुल चे मुख्याध्यापक सारीपुत्र जांभुळकर, प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका नलिनी पिंगे, पर्यवेक्षक तथा राष्ट्रीय हरीत सेना विभाग प्रमुख बादल बेले, सहायक शिक्षक नवनाथ बुटले, प्रशांत रागीट, मेघा वाढई, प्रतिभा मोरे, आशा बोबडे, शाहीन पठान आदींनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top